Karisma Kapoor Aamir Khan Kissing Scene : आमिर खान व करिश्मा कपूर यांच्या ‘राजा हिंदुस्तानी’ या चित्रपटाने २९ वर्षांपूर्वी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. ६ कोटींच्या बजेटमध्ये बनवलेल्या या चित्रपटाने ७८ कोटींची कमाई केली होती. या चित्रपटात आमिर खान व करिश्मा कपूर यांचा एक मिनिटाचा किसिंग सीन होता. करिश्माने पहिल्यांदाच ऑनस्क्रीन किसिंग सीन दिला होता. या किसिंग सीनच्या शूटिंगबद्दल चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर जवळजवळ २४ वर्षांनी करिश्माने भाष्य केलं होतं.

करिश्मा कपूरने आमिर खानबरोबर ‘राजा हिंदुस्तानी’ सिनेमात काम केलं होतं. १९९६ साली आलेल्या या सिनेमात आमिर व करिश्माचा १ मिनिटांचा किसिंग सीन होता. करिश्माने एका मुलाखतीत या सीनच्या शूटिंगमध्ये आलेल्या अडचणी सांगितल्या होत्या.

किसिंग सीनचे तब्बल ४७ रिटेक

हा सीन तीन दिवस ऊटीमध्ये शूट करण्यात आला होता, असं करिश्माने म्हटलं होतं. या सीनसाठी १-२ नव्हे तर तब्बल ४७ रिटेक घेण्यात आले होते, असं करिश्माने राजीव मसंदला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं. “फेब्रुवारी महिना होता. कडाक्याची थंडी होती. ऊटीमध्ये हा सीन तीन दिवस शूट करण्यात आला होता. मला प्रचंड थंडी वाजत होती. हा सीन कधी संपेल, असं वाटत होतं,” असं करिश्मा म्हणाली होती.

आमिर खान व करिश्मा कपूर

कठीण परिस्थितीत चित्रित केलेला सीन

“तो सीन खूप कठीण परिस्थितीत चित्रित करण्यात आला होता. लोक सहज ‘अरे तो सीन’ असं म्हणतात. पण वातावरण इतकं बिघडलं होतं की परिस्थिती खूप अवघड झाली होती. थंड वारे वाहत होते. पाऊस पडत होता. अशा परिस्थितीतही आम्ही सकाळी ७ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत काम करायचो. शूटिंग दरम्यान आम्ही खरोखरच थरथरत होतो,” असं करिश्मा म्हणाली होती.

‘राजा हिंदुस्तानी’ चित्रपटाचे दिग्दर्शक धर्मेश दर्शन यांनी त्यांच्या एका मुलाखतीत सांगितलं होतं की, करिश्मा कपूरची आई बबिता शूटिंगमध्ये तिच्याबरोबर होत्या. आमिर व करिश्माच्या किसिंग सीनचे शूटिंग तीन दिवस झाले होते आणि ते तिन्ही दिवस बबिता सेटवर उपस्थित होत्या. बबिता यांनी धर्मेश यांच्याशी या दृश्याबद्दल बराच वेळ चर्चा केली होती, जेणेकरून त्यांच्या मुलीला अनकंफर्टेबल वाटणार नाही.