बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन सध्या त्याच्या आगामी ‘शहजादा’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. ‘भूलभुलैया २’ या चित्रपटानंतर कार्तिकचे चाहते त्याच्या या चित्रपटाची आतुरतेने वाट पहात होते. कार्तिकसह या चित्रपटात अभिनेत्री क्रिती सनॉन मुख्य भूमिकेत दिसणार आहे. कार्तिकच्या आधीच्या चित्रपटाच्या मानाने त्याचा हा चित्रपट प्रेक्षकांना चित्रपटगृहाकडे खेचून आणण्यात अपयशी ठरला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या चित्रपटाच्या म्युझिक, सॅटेलाइट आणि ओटीटी राइट्समधून निर्मात्यांनी ६५ कोटी रुपये कमावले असले तरी बॉक्स ऑफिस मात्र हा चित्रपट म्हणावी तशी जादू करू शकलेला नाही. पहिल्या दिवसाप्रमाणेच दुसऱ्या दिवशीही हा चित्रपट काही खास कमाई करू शकलेला नाही. मीडिया रीपोर्टनुसार प्रदर्शनानंतरच्या दुसऱ्याच दिवशी या चित्रपटाने भारतात ७ ते ९ कोटीच्या आसपास कमाई केली आहे.

आणखी वाचा : “पठाणमधून पैसे मिळाले नाही?” इकोनॉमी क्लासमधून प्रवास करणाऱ्या दीपिका पदूकोणला नेटकऱ्यांचा सवाल

समीक्षक मंडळी या चित्रपटाकडून जास्त अपेक्षा ठेवून होते, पण बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट पुरताच फसला आहे. हा चित्रपट हीट व्हावा यासाठी निर्मात्यांनी चांगली शक्कल लढवली होती. पहिल्या दिवशी एकावर एक तिकीट मोफत असल्याने पहिल्या दिवशी लोकांनी या चित्रपटासाठी तिकीटबारीवर गर्दी केली, पण दुसऱ्या दिवशी मात्र म्हणावे तसे प्रेक्षक चित्रपट पाहायला आले नसल्याने कमाईचे आकडे खाली गेलेले दिसत आहेत.

आता रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने या चित्रपटाच्या कमाईत वाढ होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे. चित्रपट समीक्षक आणि ट्रेड एक्स्पर्ट तरण आदर्श यांनीदेखील पोस्ट शेअर करत चित्रपटाचे आकडे मांडले आहेत. ‘शहजादा’ हा चित्रपट अल्लू अर्जुनच्या ‘अला वैकुण्ठपुरामुलू’ या दाक्षिणात्य चित्रपटाचा रिमेक आहे. या चित्रपटात कार्तिक आर्यन व क्रिती सनॉनसह राजपाल यादव, परेश रावलसारखे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kartik aaryan kriti sanon starrer shehzada movie day two box office collection avn