know Net Worth Bollywood Actors: काही दिवसांपासून एका चित्रपटाची मोठी चर्चा सुरू आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसचे सर्व रेकॉर्ड मोडत असल्याचे पाहायला मिळत आहे. मोहित सुरी दिग्दर्शित ‘सैयारा’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत असल्याचे पाहायला मिळत आहे.
रोजच्या कमाईमुळे हा चित्रपट जितका चर्चेत आहे, तितकाच तो आणखी एका कारणामुळे चर्चेत आहे. चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रियांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अनेक जण दु:खात बुडून गेल्यासारखे दिसत आहेत. अनेकांनी स्वत:ला त्रास करून घेतल्याचे पाहायला मिळत आहे. तर, काही जण बेशुद्धदेखील पडत आहेत.
१८ जुलै २०२५ रोजी प्रदर्शित झालेल्या ‘सैयारा’ या चित्रपटात अहान पांडे आणि अनित पड्डा हे कलाकार प्रमुख भूमिकांत आहेत. अहानचा हा पहिलाच चित्रपट आहे. या चित्रपटातून त्याने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले आहे. त्याच्या अभिनयाचे प्रेक्षकांसह कलाकारांनीदेखील कौतुक केल्याचे पाहायला मिळत आहे. तर, अनितने याआधी काही जाहिराती व चित्रपटांमध्ये काम केले आहे. मात्र, सैयारा या चित्रपटातून तिला मोठी लोकप्रियता मिळाल्याचे पाहायला मिळत आहे.
अहान पांडे हा लोकप्रिय अभिनेता चंकी पांडे यांचा पुतण्या आहे. आता त्या निमित्ताने जाणून घेऊयात अहान, अनन्या व अलाना यांची प्रत्येकी एकूण संपत्ती किती आहे ते.
अहान पांडे
अहान पांडे हा सैय्यारा या चित्रपटातून लोकप्रिय ठरला असला तरीही त्याने याआधी असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केले आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याची ३०-३५ लाख इतकी महिन्याची कमाई होते. झीनुसार त्याची एकूण संपत्ती ४१ कोटी आहे. मात्र, अहानने याबाबत अधिकृत माहिती दिलेली नाही.
अनन्या पांडे
बॉलीवूड अभिनेत्री अनन्या पांडेची एकूण संपत्ती ७४ कोटी इतकी आहे. चित्रपट, ब्रँड प्रमोशन, तसेच रिअल इस्टेटमधील गुंतवणूक यांमधून अभिनेत्रीला उत्पन्न मिळते.
अलाना पांडे
कंटेंट क्रिएटर आणि यूट्यूबर अलाना पांडेची संपत्ती एकूण एक दशलक्ष इतकी आहे.
चंकी पांडे
ज्येष्ठ अभिनेते चंकी पांडे यांची एकूण संपत्ती सुमारे १५०-१५८ कोटी इतकी आहे. चित्रपट, तसेच रिअल इस्टेटमध्ये केलेली गुंतवणूक हा त्यांच्या कमाईचा स्रोत आहे.