अभिनेत्री क्रिती सेनॉन तिच्या दिलखुलास स्वभावामुळे सर्वांचे लक्ष वेधून घेत असते. तिच्या चाहत्यांशी, मीडिया फोटोग्राफरची ती अगदी उत्स्फूर्तपणे संवाद साधते. तर सध्या ती तिच्या शहजादा या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान तिने एका चाहत्याला “मी तुझ्याबरोबर चित्रपट पाहायला येईन” असं म्हटलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

क्रिती लवकरच ‘शहजादा’ चित्रपटात दिसणार आहे. चित्रपटात तिच्याबरोबर अभिनेता कार्तिक आर्यनही प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख कधी तोंडावर आली आहे. १७ फेब्रुवारी रोजी हा चित्रपट प्रदर्शित होत आहे, त्यामुळे ही दोघंही या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करताना दिसत आहेत. काल त्यांनी एका कॉलेजमध्ये चित्रपटाच्या प्रमोशनसाठी हजेरी लावली. या वेळी क्रितीने दाखवलेला उत्स्फूर्तपणा सर्वांनाच भावला.

आणखी वाचा : सिद्धार्थ-कियारा पाठोपाठ प्रभास-क्रिती सेनॉन करणार त्यांचं नातं ऑफिशिअल? साखरपुड्यासंबंधित ‘ते’ ट्वीट चर्चेत

क्रितीने तिचा आणि कार्तिकचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर नुकताच पोस्ट केला. यात क्रिती आणि कार्तिक त्यांच्या चाहत्यांशी संवाद साधताना दिसत आहेत. यावेळी क्रिती म्हणते की, “व्हॅलेंटाईन डे हा प्रेम करण्याचा दिवस आहे आणि त्यासाठी गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड असण्याची गरज नाही.” त्यावर कार्तिक म्हणतो की ज्यांना कोणीच नाहीये त्यांनी काय करायचं?” त्यानंतर क्रिती म्हणते, “पण त्यांना मित्र-मैत्रिणी तर आहेत. त्यांच्याबरोबर ते चित्रपट पाहायला जाऊ शकतात.” क्रितीच हे म्हणणं ऐकताच प्रेक्षकांमध्ये बसलेला तिचा एक चाहता तिला म्हणतो की मला मित्र-मैत्रिणीही नाहीत. त्यावर क्रिती उत्स्फूर्तपणे म्हणते, “बरं मग मी येते तुझ्याबरोबर चित्रपट पाहायला.”

हेही वाचा : पुण्याला पोहोचताच श्रद्धा कपूरने घेतला अस्सल पुणेरी मिसळ व वडापावचा आस्वाद, म्हणाली, “आयुष्यभरासाठीचा…”

क्रितीचं हे म्हणणं ऐकून तिकडे उपस्थित सगळेच जण आश्चर्यचकित होतात. क्रितीचं हे बोलणं ऐकताच सर्वजण टाळ्या वाजवायला लागतात. त्यावर कार्तिक म्हणतो, “म्हणजे आम्हाला भरपूर वेळा चित्रपट पाहावा लागेल.” यावर सर्वजण हसू लागतात. आता त्यांचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. तर यावर कमेंट्स करत सर्वजणांनी क्रितीच्या दिलखुलासपणाचं कौतुक केलं आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kriti sanon said she will give company while watching film to her fan who doesnt have a single friend rnv