Madhuri Dixit : ९० च्या दशकातील ‘लेडी सुपरस्टार’ म्हणून माधुरी दीक्षितला ओळखलं जातं. आजवर तिने विविध चित्रपटांमध्ये काम करून प्रेक्षकांचं मनोरंजन केलेलं आहे. यशाच्या शिखरावर असताना अभिनेत्रीने डॉ. नेनेंशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्नानंतर माधुरी आपल्या पतीसह काही वर्षे परदेशात स्थायिक झाली. तिला अरिन आणि रायन अशी दोन मुलं आहेत. नेने कुटुंबीयांनी नुकत्याच डॉ. श्रीराम नेने यांच्या युट्यूब चॅनेलवर एकत्र येऊन गप्पा मारल्या. यावेळी अभिनेत्रीने वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक खुलासे केले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

डॉ. श्रीराम नेने त्यांच्या युट्यूब तसेच इन्स्टाग्रामवर नेहमीच हेल्दी पदार्थांच्या पाककृती शेअर करत असतात. आपल्या दोन्ही मुलांमध्ये वडिलांमुळे स्वयंपाकाची आवड निर्माण झाल्याचं माधुरीने या व्हिडीओमध्ये सांगितलं आहे. लहानपणापासूनच अरिन आणि रायनमध्ये वडिलांना पाहून कुकिंगची आवड निर्माण झाली होती. याशिवाय एके दिवशी परदेश दौऱ्याहून परतल्यावर अरिनने संपूर्ण कुटुंबासाठी कसं जेवण बनवलं होतं, याची खास आठवण ‘धकधक गर्ल’ने या व्हिडीओमध्ये सांगितली आहे.

माधुरीचा धाकटा मुलगा रायनने यावेळी सांगितलं की, त्याचं शिक्षण परदेशात झाल्याने त्याला स्वयंपाक करण्यासह सगळी दैनंदिन कामं स्वतंत्रपणे करता येऊ लागली. तर, माधुरी काही वर्षांपूर्वीची आठवण सांगताना म्हणाली, “मला आठवतंय डेन्व्हरमध्ये ( अमेरिकेत ) आमच्या घरी एक मदतनीस होती. मी सकाळी उठले आणि मला किचनमध्ये कसला तरी आवाज ऐकू आला. खाली उतरल्यावर पाहिलं की रायन त्या मदतनीसला सांगून त्याला आवडतील अशी अंडी बनवून घेत होता. अंड्यांमध्ये दूध घाला आणि नंतर ते फेटून घ्या…असं रायननेच त्यांना सांगितलं. बाबाला पाहून त्याच्यामध्ये ती स्वयंपाकाची आवड निर्माण झालीये. तेव्हा तो अगदी ३ वर्षांचा होता.”

माधुरी मोठ्या मुलाबद्दल म्हणाली, “एकदा अरिनने रात्री ९.३० वाजता स्वयंपाक करायला सुरुवात केली आणि अगदी तासाभरात १०.३० ला त्याने सॅलडपासून सगळं जेवण बनवलं होतं.” यावर अरिन हसून म्हणाला, “हो कारण, तुम्ही त्यावेळी पदेशातून ट्रॅव्हल करून आला होता आणि खूप थकला होतात. फक्त जेवणासाठी उठलात आणि परत झोपी गेलात.”

“प्रत्येक कुटुंबात एक अशी क्रिया असते जी त्यांना जवळ आणते आणि आपल्या नेने कुटुंबाचे बंध स्वयंपाकामुळेच आणखी घट्ट झाले आहेत.” असं सांगत श्रीरान नेने यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Madhuri dixit reveals both sons having inherited love for cooking from dad shriram nene sva 00