Taapsee Pannu On Misha Agarwal Suicide: काही दिवसांपूर्वी लोकप्रिय इन्फ्लुएन्सर व कंटेंट क्रिएटर मिशा अग्रवाल हिचं निधन झाल्याची दुःखद बातमी समोर आली. वयाच्या २४व्या वर्षी तिने अखेरचा श्वास घेतला. २५व्या वाढदिवसाच्या दोन दिवसाआधी मिशाने आत्महत्या केली. यामुळे एकच खळबळ उडाली. मिशाने अचानक असं का केलं? सगळ्यांना खळखळून हसवणाऱ्या मिशाने टोकाचं पाऊल का उचललं? असे अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले. पण, मिशा अग्रवालच्या आत्महत्येचं खरं कारण समोर आल्यापासून सगळ्यांना धक्का बसला आहे. एवढंच नाही तर तापसी पन्नूने देखील यासंदर्भात पोस्ट लिहित चिंता व्यक्त केली आहे.

मिशा अग्रवालच्या कुटुंबाने तिच्या आत्महत्येमागच्या खऱ्या कारणाचा खुलासा केला आहे. त्यांनी सांगितलं की, गेल्या काही दिवसांपासून मिशा इन्स्टाग्रावरील फॉलोअर्स कमी होतं असल्यामुळे खूप चिंतेत होती. याच गोष्टीचा मिशाने स्वतःला खूप त्रास करून घेतला आणि त्यामुळे तिने आत्महत्या केली. मिशाच्या आत्महत्येचं कारण समोर येताच सर्वजण हैराण झाले आहेत. यासंदर्भात तापसी पन्नूने इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट लिहिली आहे.

तापसी पन्नूने लिहिलं, “गेल्या बऱ्याच दिवसांपासून मला याचीच भीती होती. कारण माझ्या आजूबाजूची लोक फॉलोअर्सबाबतीत खूप वेडे आहेत. मला अशी भीती वाटतेय की, असा एक दिवस येईल जेव्हा ही संख्या आपल्या आयुष्यावर खूप जास्त प्रभाव करेल. तसंच या आभासी प्रेमाची तुमची नितांत गरज तुम्हाला तुमच्या खऱ्या प्रेमाबद्दल आंधळं करेल आणि लाइक्स व कमेंट्सचे हे समाधान तुम्हाला मौल्यवान बनवणाऱ्या डिग्रीपेक्षा जास्त होईल. अशी परिस्थिती पाहणं हे खूप वेदनादायी असणार आहे.”

तापसी पन्नू इन्स्टाग्राम स्टोरी

दरम्यान, तापसी पन्नूच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, ती लवकरच ‘गांधारी’ चित्रपटात दिसणार आहे, जो एक अ‍ॅक्शन थ्रिलर चित्रपट आहे. याशिवाय ती ‘वो लडकी है कहां’ मध्येही झळकणार आहे. तसंच ‘हसीन दिलरुबा ३’ मध्येही तापसी पन्नू पाहायला मिळणार आहे.