Actor Reveals He Was Mistreated by Pooja Pooja Bhatt: मुझम्मिल इब्राहिमने सुपरमॉडल म्हणून स्वत:ची ओळख निर्माण केली. त्यानंतर त्याने चित्रपटांतदेखील काम केले आहे. ‘धोखा’ या चित्रपटातून मुझम्मिल इब्राहिमने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.
“मला अपमानजनक वागणूक मिळाली”
‘धोखा’ या चित्रपटाचे दिग्दर्शन महेश भट्ट व पूजा भट्ट यांनी केले होते. आता एका मुलाखतीत अभिनेत्याने या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान पूजा भट्टने वाईट वागणूक दिल्याचे अभिनेत्याने वक्तव्य केले आहे. सेटवर अशा प्रकारची वागणूक मिळेल, अशी त्याला अपेक्षा नव्हती, असेही त्याने म्हटले.
सिद्धार्थ कननला दिलेल्या मुलाखतीत अभिनेता म्हणाला, “मी प्रोफेशनल नाही, असे त्यावेळी मला पूजा भट्ट म्हणाली होती. ती ज्या पद्धतीने राग व्यक्त करायची, वागायची त्यामुळे कलाकारांचा आदर होत असे. मी चांगला अभिनेता होतो, त्यामुळे महेश भट्ट यांना मी आवडायचो. मी लहान होतो. माझं वय फक्त २०वर्षे होते.”
‘धोखा’च्या सेटवर मला जी वागणूक दिली गेली, त्याबद्दल मी बोलूदेखील शकत नाही. ती घृणास्पद वागणूक होती. ती शिवीगाळ करायची. ज्या पद्धतीने मला वागवले गेले, त्यानंतर मला त्यांच्याकडून अपेक्षा राहिल्या नाहीत.
मुझम्मिल म्हणाला, “‘धोखा’ चित्रपटाच्या सेटवर आलेल्या अनुभवानंतर मला भीती वाटू लागली. मला वाईट स्वप्ने पडत असत. मी भारताचा सुपरमॉडेल होतो. तिथे मला फार वेगळ्या पद्धतीची वागणूक मिळायची आणि ‘धोखा’ चित्रपटाच्या सेटवर मला अपमानजनक वागणूक मिळाली. महेश भट्ट साहेबांना ते सर्व कळत होते. त्यांनी पूजा भट्टला अनेकदा सांगितलेदेखील हे करू नकोस. पण भट्ट साहेब सेटवर नसताना परिस्थिती खूपच बिकट असायची.”
“मी असेही ऐकले की पूजा भट्ट म्हणायची की कलाकारांनी श्वानासारखे असायला हवे. जेव्हा सांगेल तेव्हा त्यांनी बसले पाहिजे. मला त्रास देण्यासाठी लेख लिहिले गेले, त्यामुळे मला भीती वाटायची. त्या परिस्थितीचा परिणाम मला स्वत:वर होऊ द्यायचा नव्हता. माझा दिवस व्यवस्थित जावा, यासाठी मी प्रार्थना करत असे. मला नैराश्याचा सामना करावा लागला.” अभिनेता असेही म्हणाला या चित्रपटात आलेल्या अनुभवामुळे ‘राझ २’ मध्ये त्याने काम केले नाही.
‘धोखा’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. मुझम्मिल इब्राहिमच्या अभिनयाचे विशेष कौतुक झाले.या चित्रपटाच तुलिप जोशी, अनुपम खेर, गुलशन ग्रोवर हे कलाकार देखील या चित्रपटात महत्वाच्या भूमिकेत होते.