Naseeruddin Shah Reacts To Diljit Dosanjh Post : पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिरबरोबर भारतीय गायक आणि अभिनेता दिलजीत दोसांझने ‘सरदार जी ३’ या चित्रपटात काम केल्याने त्याच्यावर जोरदार टीका झाली. या टीकेवर ज्येष्ठ बॉलीवूड अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी दिलजीतची बाजू घेतली होती. दिलजीतला पाठिंबा देत त्यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली होती. ‘माझा दिलजीतला खंबीर पाठिंबा आहे’, असं त्यांनी पोस्टमध्ये लिहिलं होतं.

पहलगाममधील दहशवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांबरोबर काम न करण्याची भूमिका तीव्र करण्यात आली होती. तरीही दिलजीतने हानियाबरोबर काम केल्याने, त्यावर जोरदार टीका झाली. त्यातच नसीरुद्दीन यांनी दिलजीतची बाजू घेत त्याला पाठींबा दिला होता. त्यामुळे अनेक नेटऱ्यांनी त्यांच्या पोस्टफवर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या.

यानंतर नसीरुद्दीन शाह यांच्या फेसबुक अकाऊंटवर संबंधित पोस्ट दिसत नव्हती. त्यामुळे त्यांनी ही पोस्ट डिलीट केली की काय अशा चर्चा होत्या. मात्र ही पोस्ट डिलीट करण्यात आली नसून ती काढण्यात आली आहे असं स्वत: नसीरुद्दीन शाह यांनी सांगितलं आहे. मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे आणि मी ती पोस्ट डिलीट केलेली नाही असं स्वत: नसीरुद्दीन यांनी स्पष्ट केलं आहे. याबद्दल त्यांनी नुकतीच प्रतिक्रिया दिली आहे.

दिलजीत दोसांझ इन्स्टाग्राम पोस्ट

‘इंडियन एक्सप्रेस’मधील एका लेखात, नसीरुद्दीन शाह यांनी स्पष्ट केले आहे की, “दिलजीत दोसांझच्या समर्थनार्थ लिहिलेली पोस्ट (जी काढण्यात आली आहे, मी स्वतः डिलीट केलेली नाही) त्यावर मला काहीच स्पष्टीकरण द्यायचं नाही. मला जे काही बोलायचं होतं; ते मी बोललो आहे. त्यावर मी अजूनही ठाम आहे. मला इंडस्ट्रीतून पाठिंबा मिळाला नाही, याचं वाईटही वाटत नाही आणि मला त्याची अपेक्षाही नाही.”

दरम्यान, नसीरुद्दीन यांनी पोस्ट करत “माझा दिलजीतला पाठिंबा आहे. जुमला पार्टी घाणेरडे आरोप करून दिलजीतवर निशाणा साधत आहेत. चित्रपटाच्या कास्टिंगचा निर्णय हा त्याचा नव्हताच. त्यानं फक्त चित्रपटासाठी निवड झालेल्या कलाकारांसह काम केलं आहे. या लोकांना भारत-पाकिस्तानमधील लोकांमध्ये वाद निर्माण करायचे आहेत” असं म्हटलं होतं.