बॉलीवूड स्टार वरुण धवन नेहमी चर्चेत असतो. आज महाराष्ट्रातील १३ मतदारसंघात लोकसभा निवडणुकीचा पाचवा टप्पा पार पडला. यासाठी अनेक कलाकारांनी मतदान केंद्रावर जाऊन मतदान केलं. वरुण धवननेदेखील मतदानाचा हक्क बजावत मतदान केलं आणि त्याचा फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केला.

वरुणची पत्नी नताशादेखील मत द्यायला घराबाहेर पडली. नताशा गरोदर असल्याने तिची व्यवस्थित काळजी घेत मतदान केंद्रावर तिला सुरक्षित नेण्यात आलं. मतदान केंद्राजवळचा नताशाचा व्हिडीओ विरल भयानी या पापाराझी अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. नताशाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.

हेही वाचा… ‘तारक मेहता…’ फेम मंदार चांदवडकरने शेअर केला खास व्हिडीओ; अभिनेता म्हणाला, “दोस्तो क्या…”

मतदानासाठी आलेल्या नताशाने निळ्या आणि सफेद रंगाचा फ्लोरल प्रिंट असलेला ड्रेस परिधान केला होता. मोकळे केस, मिनिमल मेकअप आणि सनग्लासेसची निवड करत हा लूक पूर्ण केला होता. या व्हिडीओत नताशाच्या वाढलेल्या बेबी बंपने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं.

नताशाच्या या व्हायरल झालेल्या व्हिडीओवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. एकाने कमेंट करत लिहिलं, “गरोदर असतानाही तुम्ही तुमचं मौल्यवान मत देण्यास गेल्या आहात यासाठी तुमचा खूप आदर”, तर अनेकांनी नताशाला मुलगा होणार की मुलगी याचा तर्कवितर्क लावायला कमेंट्समध्येच सुरुवात केली आहे.

हेही वाचा… “आडनाव जोग आणि काटा काढता येत नाही”, बाळासाहेब ठाकरे यांचा ‘तो’ किस्सा सांगत अनंत जोग म्हणाले…

तर काही नेटकऱ्यांनी नताशाबरोबर वरुण का नाही असा प्रश्नदेखील उपस्थित केला आहे. एका नेटकऱ्याने “वरुण कुठे आहे?” अशी कमेंट केली, तर दुसऱ्याने कमेंट करत लिहिलं, “या अवस्थेत वरुण नताशाला सांभाळायला तिच्याबरोबर असायला हवा होता.”

हेही वाचा… “माझ्या डोळ्यातून घळाघळा पाणी…”, घटस्फोट घेतल्यानंतर शर्मिष्ठा राऊतची झाली होती ‘अशी’ अवस्था, अभिनेत्री म्हणाली…

दरम्यान, वरुण आणि नताशाबद्दल सांगायचं झालं तर २४ जानेवारी २०२१ रोजी वरुणने नताशाबरोबर लग्नगाठ बांधली. लग्नाच्या तीन वर्षांनंतर १८ फेब्रुवारीला नताशा आणि वरुणने नताशा प्रेग्नेन्ट असल्याची गुड न्यूज चाहत्यांना दिली. नताशाच्या बेबी बंपला किस करतानाचा फोटो वरुण धवनने शेअर करत ही गोड बातमी सगळ्यांना दिली होती. नुकताच नताशाचा डोहाळेजेवणाचा कार्यक्रम पार पडला. लवकरच नताशा व वरुण धवन आई-बाबा होणार आहेत. त्यांच्या गोंडस बाळाची चाहते आतुरतेने वाट पाहतायत.