बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीची पूर्वाश्रमीची पत्नी आलिया सिद्दीकी मागच्या अनेक दिवसांपासून त्याच्यावर गंभीर आरोप करत आहे. दोघांचा वाद चांगलाच चर्चेत राहिला होता. अशातच आलिया अडचणीत आली आहे. तिच्या मैत्रिणीनेच तिच्यावर गंभीर आरोप केले आहेत. आलियाची जवळची मैत्रीण मंजू गंडवाल हिने तिच्यावर लाखो रुपये घेतले आणि ते परत न केल्याचा आरोप केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

Open Letter: “आम्हाला आळशी म्हणण्यापेक्षा…” सोनाली कुलकर्णीला भारतीय मुलीचं खुलं पत्र

“आलियाने चार वर्षांपूर्वी आपल्या आई-वडिलांकडून चित्रपट बनवण्यासाठी ५० लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. इतकी वर्षे उलटून गेल्यानंतरही तिने पैसे परत केले नाही. आलियाला चित्रपट निर्मितीसाठी पैशांची गरज होती, त्यावेळी माझ्या कुटुंबीयांनी मदत केली. पण, त्यापैकी आलियाने फक्त २७.५ लाख रुपये परत केले आणि उर्वरित पैसे दिले नाहीत,” असा आरोप मंजूने तक्रारीत केला आहे. आलियाने त्या चित्रपटाच्या कार्यकारी निर्मात्याचे सात लाख रुपयेही दिलेले नाहीत, असंही मंजू म्हणाली.

“पैसे कमावणारा नवरा…” भारतीय मुलींना आळशी म्हणणाऱ्या सोनाली कुलकर्णीवर उर्फी जावेद संतापली

आलियाने चित्रपट रिलीज होण्यापूर्वी चेक दिले होते, पण ते बाऊन्स झाले. तिने १४ फेब्रुवारी २०२३ पर्यंत सर्व पैसे परत करण्याचे आश्वासन दिले होते, परंतु अजून दिले नाहीत. आता हे प्रकरण कोर्टात नेलं आहे आणि आपण आता आलियाला डिमांड नोटीस पाठवली आहे, असं मंजूने सांगितलं. दरम्यान, आलियाच्या वकिलाने या आरोपांवर प्रतिक्रिया दिली आहे. आलियाची आर्थिक स्थिती सध्या चांगली नाही, पण तिच्याकडे पैसे आले की ती उर्वरित रक्कम देईल, असं वकिलांनी म्हटलंय.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nawazuddin siddiqui ex wife aaliya siddiqui took 50 lakh from friend and never return complaint filed hrc