Malaika Arora Father Anil Mehta Death: अभिनेत्री मलायका अराराचे सावत्र वडील अनिल मेहता यांचे बुधवारी (११ सप्टेंबर) निधन झाले. अनिल मेहता यांनी मुंबईतील वांद्रे भागातील ते राहत होते त्या इमारतीतून उडी घेतली. त्यांनी आत्महत्या केल्याचं दिसतंय, पण तपासानंतरच नेमकं काय घडलं ते कळेल असं पोलिसांनी सांगितलं. अनिल मेहता यांच्या निधनाने मलायका व तिच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

बुधवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. अनिल मेहतांचे निधन झाले तेव्हा मलायकाची आई जॉयसी घरात होत्या. मलायका अरोरा पुण्यात होती. वडिलांच्या निधनाबद्दल कळाल्यानंतर ती परत आली. अनिल मेहता यांच्या निधनानंतर अरबाज खान सर्वात आधी त्यांच्या घरी पोहोचला होता. त्यानंतर त्याचा भाऊ सोहेल खान, बाबा सलीम खान, आई सलमा खान हे सर्वजण आले होते. या दुःखद प्रसंगी अर्जुन कपूरही तिथे होता.

चौकीदार मदतीसाठी ओरडत होता अन्…; मलायकाच्या आईने सांगितलं काय घडलं? घटस्फोटानंतरही एकत्र राहायचे अनिल अरोरा-जॉयसी

अर्जुन कपूर (Arjun Kapoor with Malaika Arora) दिवसभर मलायकाच्या घरी होता. रात्री उशीरा मलायका आई-वडिलांच्या घरातून तिच्या घरी जायला निघाली. त्यावेळी अर्जुन तिच्याबरोबर होता. अर्जुनने मलायका व तिचा मुलगा अरहान यांना कारमध्ये बसवलं आणि नंतर तो तिथून बाहेर पडला. मलायका पाठोपाठ तिची बहीण अमृताही रात्री उशीरा तिच्या घरी गेली.

हेही वाचा – Video: मलायका अरोराच्या वडिलांच्या निधनाबद्दल मुंबई पोलिसांची पहिली प्रतिक्रिया; सुसाईड नोट सापडली का? म्हणाले, “अनिल अरोरा यांचा…”

या व्हिडीओवर नेटकरी कमेंट्स करून अर्जुन कपूरचे कौतुक करत आहेत. अर्जुन कपूर जेंटलमन आहे. या कठी काळात दिवसभर मलायकाबरोबर होता, अशा कमेंट्स यावर नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

व्हिडीओवर नेटकऱ्यांनी केलेल्या कमेंट्स

वडिलांच्या निधनाबद्दल मलायका अरोराने बुधवारी रात्री पोस्ट केली. त्यांच्या निधनाबद्दल कळवताना दुःख होत आहे. त्यांच्या अचानक जाण्याने कुटुंबाला धक्का बसला आहे, असं तिने पोस्टमध्ये म्हटलंय.