अजय देवगण आणि काजोल यांची मुलगी न्यासा देवगणने फिल्मी दुनियेत पाऊल ठेवण्यापूर्वीच चर्चेत राहायला सुरुवात केली आहे. न्यासा सोशल मीडियावर खूप लोकप्रिय असलेल्या स्टारकिड्सपैकी एक आहे. अनेकदा ती विविध पार्ट्यांना हजेरी लावताना दिसते. तर आता नुकतीच तिने तिची प्री बर्थडे पार्टी तिच्या मित्र-मैत्रिणींबरोबर सेलिब्रेट केली आहे. या पार्टीचे अनेक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
२० एप्रिल रोजी न्यासाचा वाढदिवस असतो. तर या महिन्यात ती १९ वर्षाची होईल. नुकतीच ती जैसलमेरला रवाना झाली. याचे खास कारण म्हणजे तिची प्री बर्थडे पार्टी. न्यासाचा मित्र ओरहान अवत्रमणीने त्याच्या इन्स्टाग्रामवर अकाउंटवर या सेलिब्रेशनचे अनेक फोटो शेअर केले आहेत. हे सर्व फोटो आता सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आले आहेत.
वाढदिवसाला अजून बारा दिवस शिल्लक असतानाच तिने जैसलमेरला खास मित्र-मैत्रिणींबरोबर तिचा प्री बर्थडे सेलिब्रेट केला. ओरहानने या वेळी काढलेल्या फोटोंचा एक अल्बम त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला. या फोटोंमधून ओरहान आणि न्यासा यांच्यामधलं बॉण्डिंग पुन्हा एकदा सर्वांना दिसलं. त्यांनी एकत्रच उंट सफारीचा आनंद घेतला. तर याबरोबरच रात्री त्या सर्वांनी एकत्र बसून कॅण्डल लाइट डीनरही केला.
न्यासा आणि ओरहान एकमेकांचे खूप खास मित्र आहेत. अनेक पार्ट्यांमध्ये ते एकत्र सामील होत असतात. तर आता न्यासाच्या या प्री बर्थडे पार्टीचे फोटो हिट होत आहेत. या फोटोंवर तिचे चाहते विविध प्रतिक्रिया देत त्यांचे हे फोटो आणि हे सेलिब्रेशन आवडल्याचे सांगत आहेत.
