Premium

‘आदिपुरुष’ चित्रपटाची १० हजार तिकिटे फ्री देणार! बॉलिवूडमधील प्रसिद्ध निर्मात्याचा मोठा निर्णय

Adipurush Movie : बॉलिवूडमधील प्रसिद्ध निर्माता ‘आदिपुरुष’ चित्रपटाची १० हजार तिकिटे देणार मोफत

adipurush-tickets-free
'आदिपुरुष' चित्रपटाची १० हजार तिकिटे देणार मोफत. (फोटो : लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

बहुचर्चित ‘आदिपुरुष’ या चित्रपटाच्या प्रेक्षक प्रतीक्षेत आहेत. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा दुसरा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. टिझर प्रदर्शित झाल्यापासूनच या चित्रपटाची चर्चा आहे. रामायणावर आधारित असलेल्या या चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. प्रभास, क्रिती सेनॉन मुख्य भूमिकेत असलेला आदिपुरुष सिनेमा १६ जूनला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बॉलिवूडमधील प्रसिद्ध निर्माता अभिषेक अग्रवाल यांनी आदिपुरुष चित्रपटाची तिकिटे फ्रीमध्ये देण्याचा निर्णय घेतला आहे. अभिषेक अग्रवाल या चित्रपटाच्या तब्बल १० हजार तिकिटांचं मोफत वाटप करणार आहेत. याबाबत त्यांनी ट्विटर अकाऊंटवरुन पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे.

हेही वाचा>> Video : माधुरी दीक्षितला ‘बहरला हा मधुमास’ गाण्याची भुरळ, केदार शिंदे कमेंट करत म्हणाले…

“श्री राम यांच्याप्रती असलेल्या श्रद्धेमुळे मी आदिपुरुष चित्रपटाची १० हजार तिकिटे मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. तेलंगणामधील सरकारी शाळा, अनाथाश्रम आणि वृद्धाश्रमातील लोकांना ही तिकीटे देण्यात येतील,” असं त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे. याबरोबरच त्यांनी मोफत तिकिटासाठी गुगल फॉर्मची लिंकही ट्वीटमध्ये शेअर केली आहे.

हेही वाचा>> संत तुकारामांची पालखी सजवणाऱ्या ‘त्या’ मुस्लीम बांधवांसाठी किरण मानेंची पोस्ट, म्हणाले, “कमरभैय्यांसह इम्रान शेख…”

ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेता प्रभासने श्रीरामाची भूमिका साकारली आहे. तर क्रिती सेनॉन सीता मातेच्या भूमिकेत आहे. या चित्रपटात मराठमोळा अभिनेता देवदत्त नागेने हनुमानाची भूमिका साकारली आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Om raut adipurush 10 thousand movie tickets free distrusting by bollywood producer abhishek agarwal kak