नकारात्मक रिव्ह्यू व टीका होत असतानाही सुरुवातीचे तीन दिवस ‘आदिपुरुष’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली. पण, चौथ्या दिवसापासून चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये मोठी घट पाहायला मिळाली. रविवारी जवळपास ७० कोटी कमावणाऱ्या या चित्रपटाने सोमवारी चौथ्या दिवशी फक्त १६ कोटी रुपये कमावले. त्यानंतर पाचव्या दिवसाची आकडेवारी समोर आली असून तीही खूप कमी आहे.

नातवाच्या लग्नात धर्मेंद्रनी पहिल्या पत्नीबरोबर दिल्या पोज, ‘अशी’ दिसते सनी देओलची पत्नी पूजा, करणने शेअर केले Family Photos

रविवारच्या तुलनेत सोमवारी चित्रपटाच्या कमाईत ७५ टक्क्यांहून अधिक घट नोंदवण्यात आली होती. अशातच ‘आदिपुरुष’च्या मंगळवारच्या कमाईचे आकडेही समोर आले आहेत, जे खूपच निराशाजनक आहेत. ‘सॅकनिल्क’च्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, ‘आदिपुरुष’ ने रिलीजच्या पाचव्या दिवशी म्हणजे मंगळवारी फक्त १०.८० कोटी कमावले. चित्रपटाची देशांतर्गत एकूण कमाई आता २४७.९० कोटींवर गेली आहे.

कोकणातील गावी पोहोचला भाऊ कदम, कौलारू घरातील लाकडी फळीवर लिहिलेली ‘ती’ दोन वाक्ये चर्चेत

‘आदिपुरुष’वरून झालेल्या वादामुळे लोक या चित्रपटाकडे पाठ फिरवत आहेत. चित्रपटाचे घटणारे कलेक्शन पाहून लोक आता हा चित्रपट पाहत नसल्याचं दिसत आहे. चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकिंगमध्येही घट झाली आहे. अशा परिस्थितीत तब्बल ६०० कोटी रुपयांच्या मोठ्या बजेटमध्ये तगड्या स्टारकास्टसह बनवलेला हा चित्रपट खर्चाची रक्कम तरी वसूल करू शकेल का, याबाबत शंका उपस्थित होत आहे.

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दिग्दर्शक सचिन गोस्वामींनी दिली मुलांच्या कामांबद्दल माहिती, म्हणाले, “पार्थेशने दोन वर्षे…”

ओम राऊत दिग्दर्शित या चित्रपटाची प्रचंड चर्चा होती. दोन वेळा टीझर व दोन वेळा ट्रेलर दुरुस्त केल्यानंतर चित्रपट प्रदर्शित करण्यात आला. पण तरीही तो प्रेक्षकांना भावला नाही. शिवाय चित्रपटातील संवादांमुळेही नेटकरी संताप व्यक्त करत आहेत.