भारतीय चित्रपटसृष्टीत अशा अनेक दिग्गज अभिनेत्री आहेत, ज्यांनी अनेक भाषांमध्ये काम केले आहे. मधुबाला, सावित्री, मीना कुमारी आणि नर्गिसपासून ते शबाना आझमी, स्मिता पाटील, रेखापर्यंत अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांच्या अभिनयाची चर्चा आजही होताना दिसते. या सर्वात श्रीदेवी(Sridevi) यांचे नाव अग्रस्थानी येते. त्यांनी त्यांच्या कामातून, अभिनयातून, चित्रपटांप्रति त्यांच्या समर्पणातून प्रेक्षकांच्या, सहकलाकारांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली. आजही त्यांच्याबद्दल आदराने बोलले जाते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पंकज पाराशर काय म्हणाले?

श्रीदेवी यांनी दिग्दर्शक पंकज पाराशर यांच्याबरोबर दोन चित्रपटांत काम केले होते. १९८९ ला प्रदर्शित झालेल्या ‘चालबाज’ व २००४ साली प्रदर्शित झालेला ‘मेरे बीबी का जवाब नहीं’ या चित्रपटात श्रीदेवीने काम केले होते. ‘चालबाज’मधील भूमिकेसाठी श्रीदेवींना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. आता दिग्दर्शक पंकज पाराशर यांनी एका मुलाखतीत श्रीदेवी समोर आल्यानंतर बॉलीवूडचे दिग्गज अभिनेते आदर म्हणून उठून उभे राहिले होते, अशी आठवण सांगितली आहे.

रेडिफबरोबर बोलताना पंकज पाराशर यांनी म्हटले, ‘हिंमतवाला’, ‘तोहफा’, ‘सदमा’, ‘मिस्टर इंडिया’, ‘नगिना’ हे चित्रपट प्रदर्शित झाले होते. श्रीदेवीने तिच्या अभिनयाने सर्वांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले होते. एकदा एका सीनबाबत चर्चा करण्यासाठी फिल्म सिटीच्या स्टुडिओमध्ये गेलो होतो, तिथे ती अनेक अभिनेत्यांबरोबर काम करीत होती. जेवण कऱण्याची वेळ होती. विनोद खन्ना, रणजीत, ऋषी कपूर, शक्ती कपूर हे एकत्र बसून मटण बिर्याणी खात होते. ही मटण बिर्याणी ऋषी कपूर यांच्या घरातून आली होती. अचानक ते सगळे उठून उभे राहिले. श्रीदेवी आली होती. ते पाहताना जवळजवळ सर्वोच्च लष्करी जनरल आल्यासारखे वाटले. तिने न मागता जो तिला आदर मिळत होता, तो अविश्वसनीय होता, अशी आठवण पंकज पाराशर यांनी सांगितली.

‘चालबाज’ या चित्रपटाबद्दल बोलायचे तर श्रीदेवींनी यामध्ये दुहेरी भूमिका साकारली होती. चित्रपटात रजनीकांत व सनी देओल प्रमुख भूमिकेत दिसले होते. ‘चालबाज’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला. याबरोबरच चित्रपटाचे सर्व स्तरातून कौतुकदेखील झाले. या चित्रपटाच्या शूटिंगबद्दल सांगताना पंकज पाराशर यांनी म्हटले, “चित्रपटाचे पहिले शेड्यूल हे चेन्नईमध्ये होते आणि सनी देओलसुद्धा तिथे होता. माझ्यासाठी तो खूप उत्साहाचा दिवस होता. ३०-३१ वर्षाचा तरुण दिग्दर्शक त्याचे स्वप्न जगत होता. श्रीदेवी मात्र काहीच बोलली नाही. मी तिच्याशी थेट बोलतही नव्हतो. तिच्या असिस्टंट किंवा मेकअपमॅनद्वारे आमच्यात संवाद व्हायचा. जेव्हा श्रीदेवीला चित्रपटाच्या उद्देशाबद्दल, सर्जनशीलतेबद्दल समजले तेव्हा तिचा दृष्टिकोन बदलला आणि तिच्या हेही लक्षात आले की, तिच्या इतर चित्रपटांपेक्षा हा वेगळा चित्रपट आहे”, अशी आठवण दिग्दर्शक पंकज पाराशर यांनी सांगितली.

हेही वाचा: “तुमच्या घरातील ‘श्री लक्ष्मी’ कोणी…”, कुमार विश्वास यांची सोनाक्षी सिन्हाच्या आंतरधर्मीय लग्नावर टीका? म्हणाले, “मुलांना रामायण…”

दरम्यान, दिग्गज अभिनेत्री श्रीदेवींचे २४ फेब्रुवारी २०१८ ला निधन झाले.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pankaj parashar reveals seeing sridevi rishi kapoor shakti kapoor vinod khanna jumped to their feet because of immense respect for her nsp