सध्या देशभरामध्ये दिवाळीची धामधूम सुरु आहे. सामान्यांपासून बॉलिवूडच्या सेलिब्रिटींपर्यत सर्वजण दिवाळसणाच्या तयारीला लागले आहेत. यंदाची करोनाविरहीत दिवाळी आहे. यावर्षी बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी आधीच सेलिब्रेशनला सुरुवात केली आहे. या सणाच्या निमित्ताने बऱ्याच सेलिब्रिटींनी मोठमोठ्या पार्ट्यांचे आयोजन केले होते. काही दिवसांपूर्वी फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राने दिवाळी साजरी करण्यासाठी सिनेसृष्टीमधील सहकाऱ्यांना आमंत्रण दिले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कतरिना कैफ, विकी कौशल, सिद्धार्थ मल्होत्रा, कियारा अडवानी, काजोल, करण जोहर असे बरेचसे कलाकार मनीषच्या पार्टीला उपस्थित होते. या पार्टीमधले फोटो त्याने इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहे. अभिनेता सिद्धांत चतुर्वेदीने देखील या पार्टीला हजेरी लावली होती. त्याचा पार्टीमध्ये जातानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये सिद्धांत गाडीतून उतरुन आत जाण्यासाठी निघाला असल्याचे दिसते. तेव्हा तो तेथे असलेल्या पत्रकारांना फ्लाईंग किस देतो. पुढे काही पत्रकार ‘सर नव्याजी येत आहेत, थोडं थांबता का?’ असं म्हणू लागतात. तेव्हा तो काही संकेदांसाठी थांबतो आणि पत्रकारांकडे पाहून हसत आत जाताना दिसतो.

आणखी वाचा – Video : निधनाच्या एक महिन्यानंतर राजू श्रीवास्तव यांचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल, पत्नी म्हणाल्या, “तुम्हाला जाऊन…”

पत्रकारांनी ‘नव्याजी’ म्हणून ओळख केलेली व्यक्ती नव्या नवेली नंदा आहे. ती अमिताभ बच्चन यांच्या थोरल्या मुलीची, श्वेताची मुलगी आहे. मध्यंतरी सोशल मीडियावर नव्या आणि सिद्धांत एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्या दोघांनीही आतापर्यंत या विषयावर बोलणे टाळले आहे. याच सुमारास नव्या एका बिगबजेट चित्रपटामध्ये काम करुन बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे असे म्हटले जात होते. तिने या सर्व अफवा असल्याचे स्पष्टीकरण दिले होते.

आणखी वाचा – “हा चित्रपट पैसे कमावण्यासाठी की राष्ट्रीय पुरस्कारासाठी?” कपिल शर्माच्या प्रश्नावर अजय देवगण म्हणाला…
सिद्धांत चतुर्वेदीने ‘गली बॉय’ या चित्रपटामध्ये साकारलेली एमसी शेर ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या पसंतीस पडली. तो ‘बंटी और बबली २’ आणि ‘गेहराईया’ या चित्रपटांंमध्ये झळकला आहे. त्यांचा ‘फोन भूत’ हा चित्रपट पुढच्या महिन्यामध्ये प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Paparazzi teased siddhant chaturvedi with rumoured girlfriend navya nandas name video viral yps