बॉलीवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि ‘आप’चे नेते राघव चड्ढा अखेर लग्नबंधनात अडकले. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या लग्नाची चर्चा सुरु होती. उदयपूरमधील ‘द लीला पॅलेस’मध्ये त्यांच्या शाही लग्नसोहळ्याचे आयोजन करण्यात आलं होतं. लग्नानंतर परिणीती आणि राघव यांचा रिसेप्शनमधला एक फोटो समोर आला होता. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये दोघेही खूपच सुंदर दिसत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- परिणीती चोप्रा-राघव चड्ढा लग्नबंधनात अडकले, दोघांचा पहिला फोटो समोर; साधेपणाचं चाहते करताहेत कौतुक

उदयपूरमधील रिसेप्शनमधील परिणीती आणि राघव यांचा लूक समोर आला आहे. यावेळी परिणीतीने फिकट गुलाबी रंगाची साडी नेसली होती तर राघव यांनी काळ्या रंगाचा सूट घातला होता. परिणीतीने हातात साडीच्याच रंगाच्या बांगड्या घातल्या होत्या. तसेच गळ्यात एक मोठा नकलेस घातला होता. केस मोकळे सोडले होते आणि कपाळावर कंकू दिसत होतं. रिसेप्शनमध्ये परिणीती आणि राघव यांचा लूक एकदम साधा होता. या लूकची चाहते कौतुक करत आहेत.

हेही वाचा-

दरम्यान उदयपूरमध्ये रिसेप्शन दिल्यानंतर परिणीती आणि राघव पुन्हा रिसेप्शन देणार की नाही? असा प्रश्न विचारला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार परिणीती आपल्या मित्र-मैत्रिणींसाठी मुंबईत तर राघव राजकीय नेते आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी दिल्लीत रिसेप्शन देणार आहेत. एवढंच नाही तर परिणीती आणि राघव यांची लग्नपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. त्यात ३० स्पटेंबरला आणखी एक रिसेप्शन देण्यात येणार असल्याचे समोर आले आहे. हे रिसेप्शन चंडिगढमध्ये देण्यात येणार असून यात त्यांचे नातेवाईक सहभागी होणार आहेत. मात्र, अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

गेली बरेच महिने परिणीती व राघवच्या नात्याची जोरदार चर्चा रंगली होती. याबाबत सोशल मीडियावर बऱ्याच चर्चाही रंगल्या. इतकंच नव्हे तर अनेक ठिकाणी दोघांना एकत्रित पाहिलं गेलं. मात्र दोघांनीही कधीच त्यांच्या नात्याचा उघडपणे स्वीकार केला नाही. अखेर मे महिन्यात दिल्लीमध्ये साखरपुडा करत त्यांनी आपल्या नात्याची जाहीर कबुली दिली.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Parineeti chopra and raghav chadha to have three receptions reports claim deets inside dpj