बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा नेहमी चर्चेत असते. सोशल मीडियावर परिणीती मोठ्या प्रमाणात सक्रिय आहे. व्हिडीओ आणि फोटो पोस्ट करत ती चाहत्यांना अपडेट देत असते. सध्या सगळीकडे करवा चौथचा उत्साह पहायला मिळत आहे. यंदा परिणीती चोप्राचा पहिलाच करवा चौथ होता. परिणीतीने आपल्या पहिल्या करवा चौथचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

हेही वाचा- शाहरुख खानला लेक सुहानाने दिल्या खास पद्धतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा; अनसीन फोटो शेअर करत म्हणाली…

परिणीतीने आपल्या इन्स्टाग्रामवर पहिल्या करवा चौथचे फोटो शेअर केले आहेत. परिणीतीने फोटो शेअर करत लिहिलं, ‘पहिल्या करवा चौथच्या शुभेच्छा माय लव्ह’. परिणीतीने करवा चौथला लाल रंगाचा ड्रेस घातला होता. हातात चुडा, भांगेत कुंकू आणि साधा मेकअप करत परिणीतीने हा लूक पूर्ण केला होता. या लूकमध्ये परिणीती खूप सुंदर दिसत होती. राघव चड्ढा यांनी पिवळ्या रंगाचा कुर्ता आणि पांढऱ्या रंगाचा पायजमा घातला होता.

परिणीती चोप्रा आणि ‘आप’चे नेते राघव चड्ढा यांनी २४ सप्टेंबरला लग्नगाठ बांधली. राजस्थानमधील उदयपूरमध्ये दोघांचा शाही विवाह पार पडला. या लग्नात परिणीती आणि राघव यांचे कुटुंबीय आणि जवळचे मित्रपरिवार सहभागी झाले होते. परिणीती आणि राघव यांचे लग्नातले फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

हेही वाचा- शाहरुख खानच्या ‘डंकी’चा टीझर पाहून चाहत्यांना आठवला त्याचा सुपरफ्लॉप ‘झीरो’; चित्रपट रचणार वेगळाच इतिहास

परिणीतीच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचं झालं तर, काही दिवसांपूर्वीच तिचा ‘मिशन रजनीगंज’ चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात तिच्याबरोबर अक्षय कुमारची मुख्य़ भूमिका होती. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट फ्लॉप ठरला. आता लवकरच परिणीतीचा ‘चमकीला’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात परिणीतीबरोबर दिलजीत दोसांझची मुख्य भूमिका आहे.