Video: कॅमेऱ्यासमोर चेहरा लपवल्याने दीपिका पदुकोणची राज कुंद्राशी तुलना; नेटकरी म्हणाले “बिकिनी घालून...” |pathaan actress deepika padukone troll netizens compare her with raj kundra after hiding face video viral | Loksatta

Video: कॅमेऱ्यासमोर चेहरा लपवल्याने दीपिका पदुकोणची राज कुंद्राशी तुलना; नेटकरी म्हणाले “बिकिनी घालून…”

दीपिका पदुकोणला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, व्हिडीओ व्हायरल

deepika padukone troll
दीपिका पदुकोण ट्रोल. (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

बहुचर्चित बॉलिवूडमधील ‘पठाण’ चित्रपट २५ जानेवारीला सर्वत्र प्रदर्शित झाला. या चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवसापासूनच रेकॉर्ड मोडायला सुरुवात केली आहे. बॉक्स ऑफिसवर फक्त ‘पठाण’चाच बोलबाला पाहायला मिळत आहे. ‘पठाण’मुळे चर्चेत आलेल्या दीपिका पदुकोणचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दीपिकाला नुकतंच वांद्रे येथील चित्रपटगृहाबाहेर स्पॉट करण्यात आलं. यावेळी दीपिकाने काळ्या रंगाची जीन्स व त्यावर हुडी परिधान केली होती. परंतु, कॅमेरासमोर येताच दीपिकाने तिचा चेहरा लपवला. इन्स्टंट बॉलिवूड या इन्स्टाग्राम पेजवरुन दीपिकाचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. दीपिका खाली मान घालून चालताना व्हिडीओत दिसत आहे. या व्हिडीओवरुन नेटकऱ्यांनी दीपिकाला ट्रोल केलं आहे.

हेही वाचा>> “फक्त लोकांच्या लग्नात जाणार की…” राहुल कनाल यांच्या विवाहसोहळ्यात हजेरी लावल्यामुळे सलमान खान ट्रोल

हेही वाचा>> Video: मन्नतबाहेर चाहत्यांची तुफान गर्दी, शाहरुख खान व्हिडीओ शेअर करत म्हणाला “पठाणच्या घरी…”

दीपिकाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. दीपिकाने चेहरा लपवल्यामुळे अनेकांनी तिची तुलना राज कुंद्राशी केली आहे. “मला वाटलं राज कुंद्रा आहे”, अशी कमेंट एकाने केली आहे. तर दुसऱ्याने “दीपिका राज कुंद्राची चाहती आहे, हे आज माहीत झालं”, असं एकाने म्हटलं आहे. काहींनी बेशरम रंग गाण्यातील बिकिनीवरुनही कमेंट केल्या आहेत. “चित्रपटात बिकिनी घालून बेशरम रंग दाखवले आणि आता खऱ्या आयुष्यात तोंड झाकत आहे”, असं एकाने म्हटलं आहे. तर एका युजरने “पठाण चित्रपट चांगली कमाई करत आहे. मग तोंड का लपवत आहे”, असं कमेंटमध्ये म्हटलं आहे.

हेही वाचा>> “देशाने फक्त खान आणि मुस्लीम अभिनेत्री…”, कंगना रणौतने ‘पठाण’वरुन केलेल्या ट्वीटला उर्फी जावेदचं उत्तर, म्हणाली “हिंदू कलाकार…”

‘पठाण’ चित्रपटात दीपिकाने प्रमुख भूमिका साकारली आहे. ‘पठाण’ने अवघ्या पाच दिवसांत बॉक्स ऑफिसवर २७१ कोटींची कमाई केली आहे. तर जगभरात या चित्रपटाने ५५० कोटींचा गल्ला जमवला आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-01-2023 at 16:15 IST
Next Story
“फक्त लोकांच्या लग्नात जाणार की…” राहुल कनाल यांच्या विवाहसोहळ्यात हजेरी लावल्यामुळे सलमान खान ट्रोल