scorecardresearch

Video: मन्नतबाहेर चाहत्यांची तुफान गर्दी, शाहरुख खान व्हिडीओ शेअर करत म्हणाला “पठाणच्या घरी…”

Pathaan Movie: ‘पठाण’च्या यशानंतर शाहरुख खानच्या मन्नतबाहेर चाहत्यांची गर्दी

fans crowd at shah rukh khan mannat
शाहरुख खानच्या मन्नतबाहेर चाहत्यांची गर्दी. (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

बॉलिवूड किंग शाहरुख खानचा ‘पठाण’ चित्रपट २५ जानेवारीला सर्वत्र प्रदर्शित झाला. ‘पठाण’ बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. प्रदर्शनानंतर पाचच दिवसांत शाहरुखच्या ‘पठाण’ने जगभरात ५०० कोटींचा गल्ला जमवला आहे. तब्बल चार वर्षांनंतर शाहरुखने मोठ्या पडद्यावर कमबॅक केल्याने चाहत्यांमध्येही उत्साह आहे.

‘पठाण’च्या यशानंतर शाहरुखच्या वांद्रे येथील घराबाहेर चाहत्यांनी गर्दी केली होती. शाहरुखला बघण्यासाठी चाहते आतुर होते. अखेर रविवारी(२९ जानेवारी) शाहरुखने मन्नतबाहेर येऊन चाहत्यांना त्याची झलक दाखवली. शाहरुखने चाहत्यांना फ्लाइंग किसही दिलं. चाहत्यांकडून मिळणाऱ्या या प्रेमामुळे शाहरुखही भारावून गेला आहे. त्याने सोशल मीडियावरुन मन्नतबाहेरील चाहत्यांच्या गर्दीचा व्हिडीओ शेअर केला आहे.

हेही वाचा>> “देशाने फक्त खान आणि मुस्लीम अभिनेत्री…”, कंगना रणौतने ‘पठाण’वरुन केलेल्या ट्वीटला उर्फी जावेदचं उत्तर, म्हणाली “हिंदू कलाकार…”

हेही वाचा>> Video: “चहल भाऊ वहिनी नशेत…”, पार्टीतील ‘त्या’ व्हिडीओमुळे धनश्री वर्मा ट्रोल

“पठाणच्या घरी पाहुण्यांचा पाहुणचार…मला इतकं भरभरुन प्रेम दिल्याबद्दल आणि रविवार स्पेशल केल्याबद्दल चाहत्यांचे धन्यवाद”, असं म्हणत शाहरुखने चाहत्यांचा व्हिडीओ शेअर केला आहे. शाहरुखने शेअर केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हेही वाचा>> Pathaan Box Office Collection: पाचव्या दिवशीही बॉक्स ऑफिसवर ‘पठाण’चाच बोलबाला; कमावले ‘इतके’ कोटी

शाहरुख खानने ‘पठाण’ चित्रपटातून तब्बल चार वर्षांनंतर कमबॅक केलं आहे. प्रदर्शनाच्या पहिल्या दिवसापासूनच विक्रमी कमाई करत ‘पठाण’ने अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-01-2023 at 12:36 IST