Salman Khan Galaxy Apartment : बॉलीवूड सुपरस्टार सलमान खान त्याच्या आई-वडिलांबरोबर मुंबईतील वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये राहतो. मागील वर्षी त्याच्या घरावर गोळीबार झाला होता, त्यानंतर आता एक मोठी बातमी समोर आली आहे. सलमान खानच्या घरात घुसण्याचा प्रयत्न एका महिलेने केला आहे.

सलमान खानच्या घरात बेकायदेशीरपणे घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिलेला अटक करण्यात आली आहे, अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.

अभिनेता सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटमधील घरात घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिलेला पोलिसांनी अटक केली. पोलीस महिलेची चौकशी करत आहेत, असे वृत्त एएनआयने मुंबई पोलिसांच्या हवाल्याने दिले आहे.

(सौजन्य – एएनआय)

सलमान खानच्या घरात घुसण्याचा प्रयत्न करणारी ही महिला नेमकी कोण आहे? तिने सलमानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटमधील घरात घुसण्याचा प्रयत्न का केला? याबद्दल अद्याप कोणतीच माहिती समोर आलेली नाही. या महिलेला अटक केल्यानंतर पोलीस तिची कसून चौकशी करत आहेत. चौकशीतनंतर तिने घरात घुसण्याचा प्रयत्न का केला, ते समजेल.

दरम्यान, सलमान खान राहतो ते गॅलेक्सी अपार्टमेंट कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतं. या अपार्टमेंटमधील सलमानच्या घरावर १४ एप्रिल २०२४ रोजी गोळीबार झाला होता. त्या गोळीबाराची जबाबदारी बिश्नोई गँगने घेतली होती. त्या गोळीबारानंतर सलमानच्या घराबाहेरील सुरक्षा वाढवण्यात आली होती. अशातच आता वर्षभराने एका महिलेने त्याच्या घरात घुसण्याचा प्रयत्न केला, अशी बातमी आली आहे.