Adipurush Box Office Collection Day 9: १६ जून रोजी प्रदर्शित झालेला ‘आदिपुरुष’ चित्रपट अवघ्या एका आठवड्यात बॉक्स ऑफिसवर सपशेल आदळला आहे. शुक्रवारी प्रदर्शित झाल्यानंतर सुरुवातीचे तीन दिवस दमदार कमाई करणाऱ्या या चित्रटपटाच्या कलेक्शनमध्ये सोमवारपासून घट पाहायला मिळाली होती. आठव्या दिवशीही परिस्थिती जशी होती तशीच राहिली. शनिवार रविवार वीकेंडमुळे प्रेक्षक थोडी गर्दी करतील अशी अपेक्षा होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मात्र नवव्या दिवशीही लोकांनी चित्रपट न पाहणंच पसंत केलं असल्याचं स्पष्ट दिसत आहे. निर्माते आणि लेखकांनी काही संवाद बदलले असले तरी त्याचा फारसा परिणाम झालेला नाही. दुसऱ्या शनिवारी ‘आदिपुरुष’ने जवळपास ५.२५ कोटींची कमाई केली. चित्रपटाचे एकूण बॉक्स ऑफिस कलेक्शन हे २६८.५५ कोटी इतके झाले आहे.

आणखी वाचा : “यांना परमेश्वरही…” मराठा मंदिर चित्रपटगृहाचे मालक मनोज देसाई ‘आदिपुरुष’च्या निर्मात्यांवर संतापले

पहिल्या ३ दिवसांची कमाई पाहता हा चित्रपट चांगलीच कमाई करेल अशी अपेक्षा होती, पण पहिल्या दिवशी ८६.७५ कोटी भारतात कमावणाऱ्या या चित्रपटाने चौथ्या दिवशी मात्र १६ कोटी इतकीच कमाई केली. पहिल्या सोमवारच्या कमाईत सर्वाधिक घट होण्याचा रेकॉर्डही ‘आदिपुरुष’च्या नावावर आहे. अशीच परिस्थिती कायम राहिली तर पुढील आठवड्यापर्यंत हा चित्रपट आपला गाशा गुंडाळेल असंही म्हंटलं जात आहे.

नुकतंच ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशनने गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहीत या चित्रपटाच्या निर्मात्यांवर एफआयआर करायची मागणी केली. पहिल्याच दिवशी चित्रपट नकारात्मक रिव्ह्यू आणि वादग्रस्त संवादामुळे वादात अडकला. पहिल्याच दिवशी १४३ कोटींची जगभरात कमाई करणारा ‘आदिपुरुष’ आता ३०० कोटींचा आकडाही पार करू शकेल की नाही अशी शंका उपस्थित केली जात आहे. चित्रपटात प्रभाससह क्रीती सनॉन, देवदत्त नागे, सैफ अली खान, सनी सिंग हे मुख्य भूमिकेत आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prabhas starrer adipurush box office collection day nine film fails to see significant jump avn