बॉलीवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि ‘आप’चे खासदार राघव चड्ढा हे दोघेही उद्या (१३ मे रोजी) साखरपुडा करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्या दोघांच्याही साखरपुड्याची जय्यत तयारी केली जात आहे. साखरपुड्यासाठी परिणीतीच्या संपूर्ण घराला बाहेरून रोषणाई केल्याचे दिसत आहे. याचा एक व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आता परिणीतीसंबंधित आणखी एक बातमी समोर येते. परिणीती आणि राघव यांच्या साखरपुड्यासाठी परिणीतीची बहीण अभिनेत्री प्रियांका चोप्रा भारतात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- Video : साखरपुड्यापूर्वी परिणिती चोप्राचे घर सजलं, रोषणाई केल्याचा व्हिडीओ आला समोर

परिणीती-राघव यांचा साखरपुडा दिल्लीतील कनॉट प्लेस येथील कपूरथला हाऊसमध्ये होणार आहे. विवाह सोहळा पारंपरिक पद्धतीने होणार आहे. साखपुड्यात सहभागी होण्यासाठी प्रियांका १३ मे रोजी सकाळी दिल्लीला पोहोचणार असल्याची माहिती मिळाली आहे. परिणीतीच्या साखपुड्यासाठी प्रियांकाने तिने आपली सगळी कामे बाजूला ठेवली असल्याचे सांगण्यात येत आहे.

हेही वाचा- ‘द केरला स्टोरी’ लवकरच पार करणार १०० कोटींचा आकडा; एका आठवड्यात जमवला ‘इतका’ गल्ला

परिणीती आणि राघव यांच्या साखरपुड्यात फक्त कुटुंबातील सदस्य आणि खास मित्र सहभागी होणार आहेत. परिणीती साखरपुड्याला डिझायनर मनीष मल्होत्राचा डिझायनर भारतीय पोशाख परिधान करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. साखपुड्यासाठी परिणीतीने अतिशय साधा पोशाख निवडला आहे. दुसरीकडे, राघव चड्ढा त्यांचे मामा आणि फॅशन डिझायनर पवन सचदेवा यांनी डिझाइन केलेले कपडे परिधान करणार आहेत.

हेही वाचा- “मी त्याच्या गालावर किस करत…” ‘सेक्रेड गेम्स’मध्ये बोल्ड सीन देणाऱ्या कुब्रा सैतचा नवाजुद्दीनबद्दल मोठा खुलासा

सध्या परिणीती तिच्या कुटुंबासह दिल्लीत आहे. ती साखरपुड्याच्या तयारीत व्यस्त आहे. परिणीती आणि राघव यांच्या साखरपुड्यासाठी १५० लोकांना आमंत्रण देण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी जवळचे मित्र आणि कुटुंबीय उपस्थित असणार आहेत. त्यांच्या साखरपुडा समारंभात सकाळी सुखमणी साहिबचे पठण केले जाईल. त्यानंतर ते दोघेही एकमेकांच्या हातात अंगठी घालत साखरपुडा करतील. यानंतर छान डिनरचे आयोजन करण्यात आले आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Priyanka chopra came to india for parineeti chopra and raghav chadha engagement dpj