Priyanka Chopra Daughter Speaks in Hindi: प्रियांका चोप्रा व निक जोनास यांची लाडकी लेक मालती चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते. अभिनेत्री तिचे गोंडस फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर चाहत्यांबरोबर शेअर करत असते. आता प्रियांकाने एक पोस्ट केली आहे. त्या पोस्टमधील तिच्या लेकीचा व्हिडीओ चर्चेत आहे. या व्हिडीओत मालती हिंदी बोलताना दिसतेय.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रियांका चोप्राने लंडनमधील काही फोटो व व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. यात काही फोटो व व्हिडीओ प्रियांकाचे आहेत. काही खाद्यपदार्थांचे फोटो आहेत, प्रवासाचे काही व्हिडीओ देखील आहेत. काही तिने काढलेले विविध ठिकाणचे सुंदर फोटो आहेत. यातच तिने पती निक व लेक मालती यांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यात मालती हिंदीमध्ये ‘ठिक हूं’ असं म्हणताना दिसते.

हेही वाचा – Video: ६ वर्षांचं नातं संपलं, मलायकाचं नाव ऐकू येताच राज ठाकरेंच्या शेजारी उभा असलेला अर्जुन कपूर म्हणाला…

प्रियांकाने कॅप्शनमध्ये लिहिलं की १९ व्या स्लाइडमध्ये मालती हिंदीत बोलतेय. त्यानंतर मालतीचा हा बाबा निकबरोबरचा व्हिडीओ खूपच व्हायरल झाला आहे. ‘मालतीचा आवाज खूप गोड आहे,’ ‘मालतीला हिंदी बोलता येतं,’ अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत. काहींनी प्रियांकाच्या या पोस्टवर रेड हार्ट इमोजी कमेंट्स केले आहेत.

पाहा व्हिडीओ –

https://www.loksatta.com/wp-content/uploads/2024/10/Priyanka-Chopra-daughter-Malti-says-theek-hoon-video.mp4
प्रियांका चोप्राने शेअर केललेा मुलीचा व्हिडीओ

हेही वाचा – Video: किंग खानने सासूबाईंबरोबर धरला ठेका; शाहरुख खान अन् सविता छिब्बर यांचा व्हिडीओ पाहिलात का?

प्रियांका चोप्रा नुकतीच भारतात आली होती. यावेळी तिने मुंबईतील एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. तिच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास तिने निर्मिती केलेला मराठी चित्रपट ‘पाणी’ १८ ऑक्टोबरला सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला. नितीन दीक्षित आणि आदिनाथ कोठारे यांची कथा असणाऱ्या ‘पाणी’मध्ये आदिनाथ कोठारे, रुचा वैद्य, सुबोध भावे, रजित कपूर, किशोर कदम, नितीन दीक्षित, सचिन गोस्वामी, मोहनाबाई, श्रीपाद जोशी, विकास पांडुरंग पाटील अशी तगडी स्टारकास्ट होती. मात्र या चित्रपटाला फारसं यश मिळालं नाही.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Priyanka chopra daughter malti says theek hoon video viral nick jonas hrc