अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या ‘सिटाडेल’ वेबसीरिजमुळे चर्चेत आहे. प्रियांकाच्या या सीरिजला चाहत्यांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. सध्या प्रियांकाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. प्रियांकाने एका मुलाखतीत तिचा ‘मिस वर्ल्ड’ स्पर्धेदरम्यानचा किस्सा सांगितला आहे. किताब जिंकला तेव्हा तिचा पती निक जोनस फक्त सात वर्षांचा होता. एवढंच नाही तर तेव्हा जोनस कुटुंबातील वातावरण कसं होतं याबाबत सांगितलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- अभिनयक्षेत्रात काम करण्यापूर्वी घरोघरी मासे पोहोचवायची ट्विंकल खन्ना; अभिनेत्रीचा मोठा खुलासा, म्हणाली, “मच्छीवाली…”

प्रियांका म्हणाली, मी मिस वर्ल्डचा किताब जिंकला तेव्हा निक सात वर्षांचा होता आणि त्याची भावंडं आठ –नऊ वर्षांची होती. हा कार्यक्रम लंडन या ठिकाणी पार पडला होता. माझ्या सासऱ्यांना असे शो पाहायला फार आवडतात. ते शो पाहत होते आणि त्या ठिकाणी निक आला. तेव्हा दोघांनी मला मिस वर्ल्डचा किताब जिंकताना एकत्र पाहिलं होतं. हे सर्व व्हायचं होतं आणि आयुष्यात अशा गोष्टी आठवणींसाठी होत असतात, असंही प्रियांका म्हणाली.

हेही वाचा- परिणीती आणि राघव चड्ढा यांच्या साखरपुड्यासाठी प्रियांका चोप्रा भारतात येणार? चर्चांना उधाण

प्रियांका चोप्रा आणि निक जोनस यांनी २०१८ साली लग्नगाठ बांधली. त्यांना एक मुलगीदेखील आहे. निक आणि प्रियांका यांच्या मुलीचं नाव मालती मेरी असं आहे. प्रियांका कायम मुलीसोबतचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते. प्रियांका सध्या पती आणि मुलीबरोबर अमेरिकेत राहत आहे. दरम्यान बहीण परिणीती चोप्रा आणि ‘आप’चे खासदार राघव चढ्डा यांच्या साखरपुड्यासाठी प्रियांका भारतात येणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Priyanka chopra shares weird story when she won miss world title nick jonas watched her win at the age of 7 dpj