ह्रतिक रोशन हा त्याच्या अभिनयासोबतच डान्स आणि फिटनेससाठी ओळखला जातो. ह्रतिकच्या फिट बॉडीवर अनेकजण फिदा आहेत. नृत्यात हृतिकशी कोणीही स्पर्धा करू शकत नाही. हृतिकला बॉलिवूडमध्ये डान्सचा देव म्हणूनही ओळखले जाते. चाहते हृतिकच्या प्रत्येक स्टाइल आणि डान्सने खूप प्रेरित आहेत, पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की एक वेळ अशी होती जेव्हा डॉक्टरांनी हृतिकला डान्स करण्यास नकार दिला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- लक्ष्मी देवीची प्रतिमा असलेला नेकलेस घालणं पडलं महागात, तापसी पन्नूविरोधात तक्रार दाखल

अलीकडेच, हृतिकचे वडील राकेश रोशन सिंगिंग रिअ‍ॅलिटी शो ‘इंडियन आयडॉल १३’ मध्ये विशेष पाहुणे म्हणून आले होते जिथे त्यांनी केवळ स्वतःबद्दलच नाही तर त्यांच्या मुलगा ह्रतिक रोशनबाबत काही धक्कादायक गोष्टी उघड केल्या आहेत. शोमध्ये त्यांनी सांगितले की डॉक्टरांनी हृतिकला बॉडी बनवण्यास आणि डान्स करण्यास स्पष्टपणे नकार दिला होता.

हेही वाचा- “मी लिहून देतो की हा चित्रपट…” प्रसिद्ध निर्मात्याचं ‘गदर २’बाबत धक्कादायक वक्तव्य

राकेश रोशन म्हणाले, ‘त्यावेळी आम्ही ‘कहो ना प्यार है’ चित्रपटाची निर्मिती करण्याचा विचार करत होतो आणि आम्ही एका नवीन व्यक्तीच्या शोधात होतो. त्यावेळी हृतिकही मोठा होत होता. आम्हाला वाटले होते की या चित्रपटात फक्त हृतिकलाच कास्ट केले जाईल. मात्र, डॉक्टरांनी सांगितले की, त्याल कधीच नाचता येत नाही, बॉडी बनवता येणार नाही, कारण त्याला स्पाइनल कोअरमध्ये काही प्रॉब्लेम आहे, पण हृतिकने डॉक्टरांच्या या गोष्टीला आव्हान दिले. त्याने सुरुवातीला पुस्तके आणि नंतर डंबेलसह व्यायाम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर हृतिक रोशनने ‘कहो ना प्यार’मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आणि त्यानंतर तो रातोरात स्टार बनला.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rakesh roshan said doctors told hrithik could never dance or build a physique due to a spinal problem dpj