बॉलिवूडचा किंग खान अशी ओळख असणारा शाहरुख खान हा सातत्याने चर्चेत आहे. शाहरुखच्या ‘पठाण’ चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई केली. या चित्रपटाने अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले आहेत. आता पठाणच्या तिसऱ्या दिवसाच्या कमाईचे अंदाजे आकडे समोर आले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बुधवारी २५ जानेवारीला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने पहिल्या दिवशी ५७ कोटींची कमाई केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने ७० कोटींचा गल्ला जमवला होता. यानुसार पहिल्या दोन दिवसांत या चित्रपटाने १२७.५० कोटींची कमाई केली. त्यानंतर तिसऱ्या दिवशीही ‘पठाण’ची क्रेझ कायम पाहायला मिळत आहे. कलाकार मंडळीसुद्धा या चित्रपटाची भरभरून प्रशंसा करताना दिसत आहेत. नुकतंच दिग्दर्शक राकेश रोशन यांनीदेखील यावर भाष्य केलं आहे.

आणखी वाचा : टॉलिवुडवर कोसळला दुःखाचा डोंगर; भर पदयात्रेत सुप्रसिद्ध अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका

चित्रपटात सलमान खानचा एक छोटासा सीन आहे आणि यादरम्यान सलमान शाहरुखमध्ये राकेश रोशन यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘करण अर्जुन’ चित्रपटातील एका संवादाचा वापर केला आहे. ‘भाग अर्जुन भाग’सारखंच या चित्रपटात सलमानच्या तोंडी ‘भाग पठाण भाग’ हा संवाद आहे. ‘ई टाइम्स’शी संवाद साधताना राकेश रोशन यांनी यावर भाष्य केलं आहे.

हा डायलॉग ऐकून राकेश रोशन यांना काय वाटलं असा प्रश्न विचारण्यात आला. यावर ते म्हणाले, “मी चित्रपटात इतका गर्क होतो की या संवादावर विचार करायची फुरसतच मला मिळाली नाही. मला चित्रपट प्रचंड आवडला. जॉन, दीपिका, शाहरुख, डिंपल सगळ्यांची कामं खूप आवडली. शिवाय चित्रपटाचं संगीत आणि सिद्धार्थ आनंद यांचं व्हीजन हेदेखील खूप पसंत पडलं.”

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rakesh roshan speaks about salman khan cameo in pathaan and iconic dialogue of karan arjun avn