हिंदी मनोरंजनसृष्टीत ड्रामा क्वीन म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री राखी सावंत नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. आता तिच्या एका व्हिडिओ नाही सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं आहे. त्या व्हिडीओमध्ये ती पाकिस्तानला जाण्यासंदर्भात बोलत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राखी सावंत तिच्या वागण्याने, बोलण्याने नेहमीच चर्चेत असते. अनेकदा तिच्या या वागणुकीमुळे तिला ट्रोलही करण्यात येतं. आता तिचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. यामध्ये ती “मी स्वतः खुदाने दिलेलं एक गिफ्ट आहे. पण हिंदुस्तानसाठी नाही,” असं ती म्हणाली.

आणखी वाचा : Video: “हिला मेंटल हॉस्पिटलमध्ये पाठवा…”; राखी सावंतने केलेला लुंगी डान्स पाहून नेटकरी हैराण

राखी सावंतच्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये ती पापाराझींना तिच्या नवीन गाडीची झलक दाखवत आहे. तेव्हा पापाराझींनी तिला विचारलं की “ही नवीन गाडी कधी घेतली?” त्यावर राखी म्हणाली, “मला गाडी घेण्याची काय गरज? संपूर्ण दुनियेत माझे आशिक आहेत. ते नेहमी मला गिफ्ट देतात. कारण मी स्वतः खुदाचं एक गिफ्ट आहे. पण हिंदुस्तानसाठी नाहीये. जास्त नाटक केलं तर मी पाकिस्तानला जाईन. जशी आपली सानिया मिर्झा गेली. मी लोखंडवालाची राणी आहे. तुम्हाला माहित आहे ना?”

हेही वाचा : Video: “मला आई व्हायचं होतं पण त्याने…” राखी सावंतचा आदिल खानबद्दल मोठा खुलासा

तर आता राखी सावंतचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर नेटकरी विविध प्रतिक्रिया देत आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rakhi sawant says she will go to pakistan under a condition know what it is rnv