scorecardresearch

Premium

Video: “हिला मेंटल हॉस्पिटलमध्ये पाठवा…”; राखी सावंतने केलेला लुंगी डान्स पाहून नेटकरी हैराण

तिचा हा व्हिडीओ आता खूप चर्चेत आला असून यावर नेटकऱ्यांनी प्रचंड टीका केली आहे.

rakhi dance

हिंदी मनोरंजनसृष्टीत ड्रामा क्वीन म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री राखी सावंत नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी तिच्या आईचे निधन झाले, तर त्यानंतर तिच्या वैवाहिक जीवनात अडचणी सुरू झाल्या. आता त्या सर्व दुःखाला मागे सारून तिने पुन्हा एकदा दिलखुलासपणे आयुष्य जगायला सुरुवात केली आहे.

राखी नेहमीच काही ना काही अतरंगीपणा करत सर्वांचं लक्ष तिच्याकडे वेधून घेत असते. तिच्या या स्वभावामुळे अनेकदा तिला ट्रोलही केलं जातं. आता तिने लुंगी नेसून लुंगी डान्स केला आहे. तिचा हा व्हिडीओ आता खूप चर्चेत आला असून यावर नेटकऱ्यांनी प्रचंड टीका केली आहे.

surbhi
“आजवर छेड काढणाऱ्या ४ पोरांना धुतलंय…,” प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचा खुलासा, म्हणाली, “शाळेत असताना…”
ira-khan-viralvideo
सतत नूपुर शिखरेला किस करणाऱ्या आयरा खानचा व्हिडीओ पाहून नेटकरी संतापले; कॉमेंट करत म्हणाले, “थोडी…”
Gutami sai mrunmayi
गौतमी देशपांडे ‘या’ लोकप्रिय अभिनेत्याला करतेय डेट? सई ताम्हणकरच्या कमेंटवर उत्तर देत मृण्मयी म्हणाली…
tharala tar mag fame actress jui gadkari
Video : ‘ठरलं तर मग’ फेम जुई गडकरीने आजीच्या आठवणीत बनवला खास पदार्थ; म्हणाली, “तिच्या हातचं…”

आणखी वाचा : “नमाज पठण करताना ‘असे’ कपडे…” नव्या व्हिडीओमुळे राखी सावंतवर नेटकरी नाराज

व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओत राखीने जीन्सवर लुंगी नेसल्याचं दिसत आहे. तर एका मोबाईलवर ‘लुंगी’ हे गाणं वाजत असताना ती ते गाऊन या गाण्यावर डान्स करत आहे. हे सगळं करत असताना तिने नेसलेल्या लुंगीचाही ती वापर करत आहे. पण तिचा हा डान्स नेटकऱ्यांना चांगलाच खटकला आहे.

हेही वाचा : “सर्व धर्मांची थट्टा…”; राखी सावंतकडून मोडला गेला रोजा, कारण ऐकताच संतापले नेटकरी

हा व्हिडीओ व्हायरल होताच पुन्हा एकदा नेटकरी तिचा हा अंदाज पाहून हैराण झाले आहेत. एका नेटकाऱ्याने लिहीलं, “आता कुठे गेला हिचा स्ट्रेस?” तर दुसरा नेटकरी म्हणाला, “हिच्या आयुष्यात सुरू असलेल्या अडचणींचं कारण ही स्वतःच आहे.” आणखी एकाने लिहीलं, “हिचं असं वागणं पाहून डोक फिरतं” तर दुसऱ्याने लिहीलं, “हिला कोणीतरी चंद्रावर सोडून या.” “हिला कोणीतरी मेंटल हॉस्पिटलमध्ये पाठवा,” असं म्हणत तिला ट्रोल केलं आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Rakhi sawant did lungi dance wearing a lungi got trolled rnv

First published on: 19-04-2023 at 10:04 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×