राखी सावंत व आदिल खान दुर्रानी यांच्यामधील वाद दिवसेंदिवस वाढत आहे. राखी आदिलसह त्याच्या कुटुंबियांवरही गंभीर आरोप करत आहे. लग्न केल्यानंतरही आदिलचे कुटुंबीय त्रास देत असल्याचं राखीने याआधीही म्हटलं होतं. आता त्याचे कुटुंबीय राखीला स्वीकारण्यासाठी तयार नाहीत असं अभिनेत्रीचं म्हणणं आहे. राखी थेट आदिलच्या घरी पोहोचली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आणखी वाचा – “तू हिंदू आहेस म्हणून…” आदिल खानच्या कुटुंबियांबाबत राखी सावंतचा नवा खुलासा, म्हणाली, “इस्लाम धर्म…”

आदिल विरोधात मैसूरमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. एका इराणी विद्यार्थिनीने वीवी पुरम पोलीस ठाण्यात कलम ३७६, ४१७, ४२०, ५०४ आणि ५०६ नुसार बलात्काराची तक्रार दाखल केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही इराणी विद्यार्थिनी डॉक्टर ऑफ फार्मसीचं शिक्षण घेण्यासाठी भारतात आली होती. या विद्यार्थीनीला पाठिंबा देण्यासाठी राखी म्हैसूरला पोहोचली आहे.

यावेळी आदिलच्या म्हैसूर येथील घरीही राखी गेली. तिने घरी जाण्यापूर्वी त्याच्या आई-वडिलांनाही फोन केला. राखी आदिलच्या घरी पोहोचली पण तिथेही त्याच्या घराला टाळा होता. राखी म्हणाली, “मी सकाळी आदिलच्या आई-वडिलांना फोन केला तेव्हा त्यांनी मला सुनावलं. मी आता माझ्या सासरी आली आहे.”

आणखी वाचा – “मी संन्यास घेतला नाही आणि…” श्री श्री रवी शंकर यांच्या आश्रमात गेली होती प्राजक्ता माळी, नेटकरी म्हणाले, “तू लग्न न करण्यातच…”

“पण घराला टाळा आहे. माझे सासू-सासरे पळून गेले आहेत. आम्ही तुला व तुमच्या लग्नाचा स्वीकार केलेला नाही.” राखी सध्या म्हैसूरमध्ये आहे. आदिलच्या घराची पाहणीही तिने केली. पण त्याच्या घरामध्ये सध्या कोणीच नाही. राखी व आदिलमधील हा वाद आणखीन किती वाढणार हे येणार काळच सांगू शकेल.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rakhi sawant visits adil khan durrani mysore home to meet his parents says they are not ready to accept me see details kmd