अभिनेत्री आलिया भट्ट व रणबीर कपूर हे बॉलीवूडमधील क्यूट कपलपैकी एक आहे. दोघांचे व्हिडीओ, फोटो हे सोशल मीडियावर कायम व्हायरल होतं असतात. आता अशाच प्रकारे रणबीर व आलियाच्या लेकीचे म्हणजे राहा कपूरचे व्हिडीओ देखील सतत व्हायरल होतं असतात. बॉलीवूडमधील लोकप्रिय स्टार किड्सपैकी राहा एक झाली आहे. राहाचा क्यूट अंदाज हा नेहमी सगळ्यांची मनं जिंकतो. सध्या राहाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राहा कपूरचा हा व्हायरल व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर ‘विरल भयानी’च्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. शुक्रवारी अभिनेत्री करीना कपूरने आपल्या घरी नातेवाईकांना आणि मित्र-मैत्रिणींना बोलावलं होतं. याच निमित्ताने आलिया आपल्या लेकीबरोबर करीनाच्या घरी गेली होती. यादरम्यानचा राहाचा हा व्हिडीओ आहे.

हेही वाचा – Video: ‘ठिपक्यांची रांगोळी’ फेम अभिनेता चेतन वडनेरेचा ‘असा’ पार पडला हळदी सोहळा, पाहा खास क्षण

या व्हिडीओत, आलिया आपल्या लेकीला कडेवर घेऊन करीनाच्या घराबाहेर पडताना पाहायला मिळत आहे. यावेळी राहाला कॅमेरापासून दूर ठेवण्यासाठी छत्रीच्या आड घेऊन जाताना दिसत आहेत. पण तरीही राहाची क्यूट झलक झाली; ज्याने सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे.

हेही वाचा – Video: ‘ठिपक्यांची रांगोळी’ फेम अभिनेता चेतन वडनेरेचा ‘असा’ पार पडला हळदी सोहळा, पाहा खास क्षण

दरम्यान, रणबीर-आलियाचं २०२२मध्ये लग्न झालं आणि त्यानंतर त्याचवर्षी ६ नोव्हेंबरला राहाचा जन्म झाला होता. दोघांनी एक वर्ष राहाचा चेहरा लपवला. गेल्या वर्षी ख्रिसमसच्या मुहूर्तावर रणबीर व आलियाने राहाची पहिली झलक दाखवली. तेव्हापासून राहाचे क्यूट व्हिडीओ नेहमी व्हायरल होतं असतात.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ranbir kapoor and alia bhatt daughter raha kapoor viral video pps