अभिनेता रणबीर कपूर त्याचा चित्रपट तू झुठी मैं मक्कारमुळे चर्चेत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने रणबीर आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही गप्पा मारत असतो. तो आणि आलिया भट्ट नोव्हेंबर महिन्यात पालक झाले. ते मुलगी राहाबरोबर वेळ घालवत आहेत. पहिल्यांदाच आई-वडील झाल्यानंतर दोघेही खूप आनंदी आहेत आणि त्यांचे अनुभव शेअर करत असतात. आपल्या मुलीचं हसणं पाहून तिला सोडून कामावर जाण्याची इच्छा होत नाही, असं रणबीर म्हणाला होता. तर, आलियाही तिच्या मातृत्वाचे अनुभव सांगत असते. दरम्यान, आता मुलगी आलियासारखी होऊ नये, असं रणबीरला वाटतंय आणि त्याचं कारणही त्याने सांगितलं आहे.
MC Stan च्या कॉन्सर्टमध्ये शिव ठाकरेचीच हवा; सुंबूलबरोबर केला जबरदस्त डान्स, Video पाहिलात का?
रणबीर म्हणाला, “मी आलियाला म्हटलं होतं की, ती तुझ्यासारखी दिसायला पाहिजे. कारण ती दिसायला खूप सुंदर असेल. पण, तिचं व्यक्तिमत्त्व तुझ्यासारखं नसून माझ्यासारखं असावं असं मला वाटतं. कारण ती आलियासारखी झाली तर घरात अशा दोन मुलींना सांभाळणं माझ्यासाठी खूप आव्हानात्मक काम असेल. त्यामुळे, राहा माझ्याप्रमाणेच शांत व्हावी, जेणेकरुन आम्ही दोघेही आलियाला सांभाळू शकू.” आलिया खूप फास्ट आहे आणि खूप बोलते, त्यामुळे दोघीही सारख्या झाल्यास आपल्याला त्यांना सांभाळता येणार नाही, असं रणबीरने सांगितलं.
Video: दुबईहून भारतात परतलेली राखी सावंत ढसाढसा रडू लागली; आदिलचा उल्लेख करत म्हणाली, “याच जागेवर…”
दरम्यान, आलिया व रणबीर यांनी एप्रिल २०२२ मध्ये लग्न केलं होतं. त्यानंतर नोव्हेंबर २०२२मध्ये त्यांची मुलगी राहाचा जन्म झाला होता. सध्या दोघेही पालकत्वाचा आनंद घेत आहेत.