Ranbir Kapoor’s Networth & Bes Movies : रणबीर कपूर हा बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेता आहे. त्याला त्याच्या घरातूनच अभिनयासा वारसा मिळाला असला तरी त्यानं आजवर विविध भूमिका साकारत, त्याच्या अभिनयशैलीनं प्रेक्षकांच्या मनात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे अभिनेत्याचा चाहतावर्ग मोठा आहे.
रणबीर कपूरचा आज ४३ वा वाढदिवस आहे. अशातच त्याच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया अभिनेत्याचे चित्रपट आणि त्याच्या संपत्तीबद्दल. रणबीर कपूरनं आजवर अनेक हिट चित्रपट दिले आहेत. संजय लीला भन्साळींच्या ‘सांवरीया’मधून त्यानं बॉलीवूडमध्ये पदार्पण केलेलं. त्यानंतर त्यानं अनेक चित्रपटांत विविध भूमिका साकारत त्याच्या डॅशिंग अंदाजानं व अभिनयशैलीनं प्रेक्षकांची पसंती मिळवली.
रणबीरच्या चित्रपटांबद्दल बोलायचं झालं, तर ‘रॉकस्टार’, ‘बर्फी’, ‘ये जवानी है दीवानी’, ‘ब्रह्मास्त्र’, ‘अॅनिमल’ हे त्याच्या सर्वाधिक गाजलेल्या चित्रपटांपैकी आहेत. इम्तियाज अली दिग्दर्शित ‘रॉकस्टार’मध्ये रणबीर कपूरनं एका रॉकस्टारची भूमिका साकारली होती, जो प्रेमात आकंठ बुडालेला असतो. त्यातील त्याच्या अभिनयाचं कौतुक झालेलं. या चित्रपटातील गाणीसुद्धा त्यावेळी चांगलीच गाजलेली.
‘बर्फी’- अनुराग बासू दिग्दर्शित ‘बर्फी’मध्ये त्याच्याबरोबर प्रियांका चोप्राही महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकलेली. त्यामध्ये रणबीरनं एका मूकबधिर मुलाची भूमिका साकारलेली. त्यातील त्याच्या अभिनयाचं अनेकांकडून कौतुक झालेलं. त्यानंतर ‘ये जवानी हैं दीवानी’ चित्रपट. रणबीरच्या ‘ये जवानी हैं दीवानी’ चित्रपटात त्याची व अभिनेत्री दीपिका पादुकोणची ऑनस्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडलेली. आजही या चित्रपटातील सीन त्यांचे चाहते रिक्रिएट करून, सोशल मीडियावर पोस्ट करताना दिसतात.
‘ब्रह्मास्त्र’- रणबीर कपूरने यामधून पहिल्यांदाच त्याची बायको आलिया भट्टबरोबर काम केलेलं. यामधील त्यांच्या केमिस्ट्रीलाही प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिलेला. त्यामध्ये त्यांच्याबरोबर अमिताभ बच्चनही झळकले होते. ‘सॅकनिल्क’च्या वृत्तानुसार या चित्रपटाने जगभरात ४३१ कोटींचा गल्ला जमावलेला.
‘अॅनिमल’- संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित ‘अॅनिमल’ चित्रपटात रणबीरचं वेगळं रूप प्रेक्षकांना पाहायला मिळालेलं. त्यामध्ये रश्मिका मंदाना, तृप्ती डिमरी या अभिनेत्री महत्त्वपूर्ण भूमिकेतून झळकलेल्या. या चित्रपटानेही बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींचा गल्ला जमवलेला. ‘अॅनिमल’ नंतर रणबीर आता ‘रामायण’ आणि ‘लव्ह अँड वॉर’मधून पाहायला मिळणार आहे.
रणबीर कपूरची नेटवर्थ किती आहे?
‘न्यूज १८’च्या वृत्तानुसार रणबीर कपूरची नेटवर्थ जवळपास ४४० कोटी इतकी आहे. तो चित्रपट व जाहिरांमधून सर्वाधिक पैसे कमावतो. रणबीर कपूरने आगामी रामायणसाठी ७५ कोटी इतकं मानधन घेतलं आहे. त्यासह तो एका जाहिरातीसाठी सहा कोटी रुपये इतकं मानधन घेतो.