Rashmika Mandanna Vijay Devarakonda : अभिनेत्री रश्मिका मंदाना व विजय देवरकोंडा यांच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. दोघांनी गुपचूप साखरपुडा उरकल्याची माहिती समोर आली आहे. सोशल मीडियावर रश्मिका व विजय दोघांवरही शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रश्मिका आणि विजय देवरकोंडाचा साखरपुडा हा एक अतिशय खासगी कार्यक्रम होता. त्यांच्या साखरपुड्याला फक्त दोन्ही कुटुंबे आणि काही जवळचे मित्र उपस्थित होते. साखरपुड्याच्या बातम्या बाहेर येऊ नयेत, म्हणून या संपूर्ण कार्यक्रमात माध्यमांना परवानगी नव्हती. तसेच त्याची बाहेर चर्चाही करण्यात आलेली नाही.
सध्या, विजय व रश्मिका यांच्या साखरपुड्याचे कोणतेही फोटो समोर आलेले नाहीत. पण रश्मिका व विजय स्वतःच ही आनंदाची बातमी शेअर करतील, असं म्हटलं जातंय. जोपर्यंत दोघेही स्वतः याची अधिकृत घोषणा करत नाहीत तोपर्यंत ही बातमी गोपनीय राहील.
विजय आणि रश्मिकाच्या नात्याबद्दलच्या चर्चा गेल्या काही काळापासून होत आहेत. पण त्यांनी कधीही उघडपणे त्यांच्या नात्याची कबुली दिली नाही. दोघेही बरेचदा एकत्र वेळ घालवताना दिसतात. ते अनेकदा रेस्टॉरंटमध्ये डेट्सवर जातात, तसेच एकत्र फिरायला जातात. दोघांचे एकाच लोकेशनवरील फोटोही चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असतात. त्यांचे चाहते बऱ्याच काळापासून त्यांच्याकडून आनंदाची बातमी येईल, अशी वाट पाहत आहेत. आता त्यांच्या साखरपुड्याची बातमी आल्याने चाहते त्यांचं अभिनंदन करत आहेत.
सूत्रांच्या माहितीनुसार, रश्मिका व विजय दोघेही पुढील वर्षी फेब्रुवारी २०२६ मध्ये लग्न करू शकतात. पण अद्याप कोणतीही निश्चित तारीख समोर आलेली नाही. लवकरच लग्नाबद्दल अधिकृत घोषणा केली जाईल, असं म्हटलं जातंय.
विजय देवरकोंडाने ‘पेल्ली चुपुलू,’ ‘अर्जुन रेड्डी,’ आणि ‘गीता गोविंदम’ सारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलंय. दुसरीकडे, रश्मिका मंदानाने ‘पुष्पा’, ‘छावा’ आणि ‘अॅनिमल’ सारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत. विजय व रश्मिका यांनी ‘गीता गोविंदम’ आणि ‘डियर कॉम्रेड’ हे चित्रपट एकत्र केले आहेत. ही जोडी लवकरच पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहे, असं म्हटलं जातंय.