‘जान तेरे नाम’ या चित्रपटातून रॉनित रॉय यांनी पदार्पण केलं. त्यांचा हा चित्रपट चांगलाच गाजला, नंतर मात्र रॉनित यांनी त्यांचा मोर्चा टीव्ही सिरियल्सकडे वळवला. ‘कसौटी जिंदगी की’ या मालिकेतून रॉनित घराघरात पोहोचले. नंतरही त्यांनी बऱ्याच हिंदी चित्रपटात छोट्या मोठ्या भूमिका साकारल्या. रॉनित यांचं हॉलिवूडचं स्वप्नं मात्र अधुरंच राहिलं, याबद्दल नुकताच त्यांनी खुलासा केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रॉनित यांचा हॉलिवूड प्रोजेक्ट करण जोहरमुळे हुकला हे नुकतंच या अभिनेत्याने स्पष्ट केलं आहे. कार्तिक आर्यनच्या ‘शेहजादा’ या आगामी चित्रपटात रॉनित आपल्याला महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. यानिमित्ताने चित्रपटातील कलाकारांनी ‘द कपिल शर्मा शो’च्या मंचावर प्रमोशनसाठी हजेरी लावली. याच कार्यक्रमादरम्यान रॉनित यांनी त्यांच्या हॉलिवूडच्या अपूर्ण स्वप्नाबद्दल खुलासा केला.

आणखी वाचा : “हे तुझ्याकडून अपेक्षित नाही…” मुस्लिम व्यक्तीबद्दल केलेल्या आर.माधवनच्या जुन्या विनोदावर नेटकऱ्यांची संतप्त प्रतिक्रिया

रॉनित रॉय यांना ऑस्कर विजेत्या ‘झीरो डार्क थर्टी’ या चित्रपटात एक महत्त्वाच्या भूमिकेसाठी विचारण्यात आलं होतं. त्यादरम्यान रॉनित रॉय हे करण जोहरच्या ‘स्टुडंट ऑफ द इयर’ या चित्रपटात काम करणार होते, काही कारणास्तव तेव्हा या चित्रपटाचं चित्रीकरण लांबणीवर पडलं होतं. रॉनित म्हणाले, “झीरो डार्क थर्टी’साठी कोणत्याही ऑडिशनशिवाय माझी निवड झाली होती. मी तेव्हा करणच्या टीमकडे या चित्रपटात काम करण्याबद्दल विचारलं, ही माझ्यासाठी एक सुवर्णसंधी होती. पण करणच्या टीमकडून यासाठी परवानगी न मिळाल्याने मला त्या हॉलिवूड प्रोजेक्टसाठी नकार कळवावा लागला.”

दरम्यान रॉनित यांच्या हातून तो हॉलिवूड प्रोजेक्ट तर निसटलाच पण ‘स्टुडंट ऑफ द इयर’चंही चित्रीकरण तेव्हा सुरू झालं नसल्याचा खुलासा रॉनित यांनी केला. २०१२ साली प्रदर्शित झालेला ‘झीरो डार्क थर्टी’ अमेरिकेने मोस्ट वॉन्टेड आतंकवादी ओसामा बिन लादेनला यमसदनी धडण्याच्या मोहिमेवर बेतलेला होता. या चित्रपटाला बरेच ऑस्कर पुरस्कारही मिळाले आणि प्रेक्षकांनीसुद्धा या चित्रपटाला पसंती दर्शवली.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ronit roy was selected to act in zero dark thirty he said no because of karan johar team avn