'आदिपुरुष'मधील रावणाच्या भूमिकेवरुन वाद, सैफ अली खान म्हणतो "मी 'महाभारत'ही करेन पण..." | saif ali khan open up about his dream role in mahabharat after adipurush controversy | Loksatta

‘आदिपुरुष’मधील रावणाच्या भूमिकेवरुन वाद, सैफ अली खान म्हणतो “मी ‘महाभारत’ही करेन पण…”

सैफ अली खानने साकारलेल्या रावणाच्या भूमिकेवरून बराच वाद सुरू आहे.

‘आदिपुरुष’मधील रावणाच्या भूमिकेवरुन वाद, सैफ अली खान म्हणतो “मी ‘महाभारत’ही करेन पण…”
सैफ अली खानने त्याच्या ड्रीम रोलबाबत बोलताना 'महाभारत'मध्ये अभिनय करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान अलिकडे अभिनेता हृतिक रोशनसह ‘विक्रम वेधा’ चित्रपटात दिसला होता. ३० सप्टेंबरला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात सैफने पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती. त्यानंतर काही दिवसांपूर्वीच त्याच्या आगामी चित्रपट ‘आदिपुरूष’चा टीझर प्रदर्शित झाला. ज्यात तो रावणाची भूमिका साकारत आहे. मात्र या चित्रपटातील त्याच्या लूकवरून सध्या सोशल मीडियावर बरीच टीका होताना दिसत आहे. सोशल मीडियावर युजर्सच नाही तर अनेक कलाकारांनी या रावणाच्या या लूकला विरोध केला आहे. अशातच आता एका मुलाखतीत सैफ अली खानने त्याच्या ड्रीम रोलबाबत बोलताना ‘महाभारत’मध्ये अभिनय करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

‘बॉलिवूड बबल’ला दिलेल्या मुलाखतीत सैफ अली खानला त्याच्या ड्रीम रोलबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नाचं उत्तर देताना त्याने ‘महाभारत’मध्ये अभिनय करण्याची इच्छा व्यक्त केली. जर महाभारताची निर्मिती कोणी ‘लॉर्ड ऑफ द रिंग्स’सारखी करणार असेल तर मला महाभारतात अभिनय करायला आवडेल असं तो यावेळी म्हणाला.
आणखी वाचा- “मी हा चित्रपट…” ‘महाभारता’त कृष्णाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याची ‘आदिपुरुष’च्या टीझरवर प्रतिक्रिया

या मुलाखतीत आपल्या ड्रीम रोलबाबत बोलताना सैफ म्हणाला, “मी माझ्या ड्रीम रोलबाबत कधी फारसा विचार केलेला नाही. जी भूमिका मला ऑफर केली जाते. त्याच भूमिकेबाबत मी विचार करतो. खरं सांगू तर माझा कोणताही ड्रीम रोल नाहीये आणि याचा विचार करण्यात काही अर्थ आहे असं मला अजिबात वाटत नाही. पण तरीही मला जे करायची इच्छा आहे ते म्हणजे, जर कोणी ‘लॉर्ड ऑफ द रिंग्स’प्रमाणे बनवणार असेल तर मला महाभारतात अभिनय करायचा आहे.”

याच मुलाखतीत सैफ अली खानने याबाबत अजय देवगणसह काम करत असल्याचा खुलासा केला आहे. रिपोर्टनुसार सैफ पुढे म्हणाला, “आम्ही अजय देवगणसह यावर काम करत आहोत. आमच्या पीढीच्या लोकांसाठी महाभारतातील भूमिका साकारणं आहे स्वप्नवत विषय आहे. जर शक्य झालं तर आम्ही यासाठी दाक्षिणात्य कलाकारांनाही या प्रोजेक्टमध्ये सहभागी करून घेऊ. या सगळ्यात मला कर्णाची व्यक्तिरेखा खूपच आकर्षक वाटते. याशिवाय महाभारतात बऱ्याच उत्तम व्यक्तिरेखा आहेत.”

आणखी वाचा- ‘आदिपुरुष’च्या ट्रोलिंगबाबत पहिल्यांदा स्पष्टच बोलला दिग्दर्शक ओम राऊत, म्हणाला, “लोकांच्या प्रतिक्रिया ऐकून…”

दरम्यान ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरूष’ चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला. रामायणावर आधारित असलेल्या या चित्रपटात प्रभास, क्रिती सेनॉन, सैफ अली खान यांच्या मुख्य भूमिका आहेत. पण टीझर प्रदर्शित झाल्यावर नेटकऱ्यांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे. चित्रपटातील व्हीएफएक्स, हनुमान आणि रावणाचा लूक यावर सोशल मीडियावरून बरीच टीका होताना दिसत आहे. खास करून सैफने साकारलेल्या रावणाच्या व्यक्तिरेखेचा लूक कोणालाच आवडलेला नाही. त्यावरून बराच वाद सुरू आहे. येत्या १२ जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
डेटिंगची इच्छा व्यक्त करणाऱ्या अनन्या पांडेकडे आर्यन खानचं दुर्लक्ष, पाहा नेमकं काय घडलं

संबंधित बातम्या

रणवीर सिंगने सर्वांसमोर सिद्धार्थ जाधवला धक्का दिला अन्… पुढे काय घडलं? पाहा व्हिडीओ
शेजारी बसलेल्या शाहरुख खानला ओळखू शकली नाही ‘ही’ अभिनेत्री; नेटकरी म्हणाले…
“सुहानाने मला…” शाहरुखने सांगितलं ४ वर्षे कामातून ब्रेक घेण्यामागचं खरं कारण
“कोणीच मला अ‍ॅक्शनपटामध्ये घेत नव्हतं अन् आता…” मी ५७ वर्षांचा आहे म्हणत शाहरुख खानचा खुलासा
“माझ्या किसिंग सीनचा व्हिडीओ मुलाने पाहिला अन्…” लेकालाच मुर्ख म्हणत ट्विंकल खन्नाचा खुलासा

व्हिडिओ

ताज्या बातम्या
“राज्यात फोडाफोडीचं राजकारण”, राजापुरात राज ठाकरेंचा आरोप, म्हणाले, “मला माहित आहे कोणाकोणाला…”
Video: “चोरी करून भारी वाटले पण…” चोराचे उत्तर ऐकून पोलीसही लागले हसायला अन तितक्यात…
दुर्दैवी ! ताडोबात वाघांच्या चार बछड्यांचा मृत्यू; मोठ्या वाघाने केला हल्ला की…
“…तर राज्यपालांचा टकमक टोकावरून कडेलोट…”, उदयनराजे भोसलेंनी मांडली आक्रमक भूमिका; रायगडावरून भाजपावरही टीकास्र!
Video : “गुरुजींनी मांडले आहेत समोर चार पाठ…” राणादाने घेतलेला उखाणा ऐकून पाठकबाई लाजल्या अन्…