अभिनेता सलमान खान सध्या ‘बिग बॉस १६’ या कार्यक्रमामध्ये व्यग्र आहे. डिसेंबर २०२२ मध्ये त्याचा ‘किसी का भाई किसी की जान’ हा बहुचर्चित चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु झाले आहे. काही दिवसांपूर्वी सलमानने या चित्रपटाच्या सेटवरचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. त्याने नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘गॉडफादर’ या तेलुगू चित्रपटामध्ये महत्त्वपूर्ण पात्र साकारले आहे. २०२३ मध्ये प्रदर्शित होणाऱ्या शाहरुख खानच्या ‘पठान’ या चित्रपटामध्येही तो झळकणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दसऱ्याच्या दिवशी मेगास्टार चिरंजीवी यांचा ‘गॉडफादर’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटामध्ये त्यांनी ‘ब्रम्हा’ हे प्रमुख पात्र साकारले आहे. हा चित्रपट ‘लूसिफर’ या सुपरहिट मल्याळम चित्रपटाचा रिमेक आहे. सलमान खानने चित्रपटामध्ये ‘मासूम भाई’ ही भूमिका साकारली आहे. त्याने मानधन न घेता ही भूमिका करण्यासाठी होकार दिला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. चित्रपटाला मिळणाऱ्या प्रतिसादाबद्दल त्याने चिरंजीवी आणि संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या आहेत.

आणखी वाचा – ‘रामायणा’त रावण साकारणाऱ्या अभिनेत्याने हेमा मालिनींच्या लगावली होती कानशिलात, वाचा नेमकं काय घडलं होतं

सलमान खान सोशल मीडियावर फार सक्रिय आहे. त्याने इन्स्टाग्रामवर नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओद्वारे त्याने मेगास्टार चिरंजीवी यांचे अभिनंदन केले आहे. या व्हिडीओमध्ये “माझे प्रिय चिरु गारु (सर) तुम्हाला खूप प्रेम. गॉडफादर बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे असे माझ्या ऐकण्यात आलं आहे. अभिनंदन. देव तुमचं कल्याण करो”, असे तो म्हणाला. चित्रपटाच्या यशाचे श्रेय प्रेक्षकांना देत त्याने “या देशातील जनतेमध्ये आहे दम, वंदे मातरम” असे म्हटले.

आणखी वाचा – “संपूर्ण जगाला तुमची…” जावेद अख्तर यांचं मिशेल ओबामांना विनंती करणारं ट्वीट व्हायरल

चिरंजीवी यांनी एका मुलाखतीमध्ये सलमानचे आभार मानले होते. चित्रपटाशी संबंधित किस्सा सांगताना ते म्हणाले, “आम्ही त्याच्याशी संपर्क केला त्यावेळी त्याने स्क्रिप्ट न वाचता चित्रपटासाठी होकार दिला. निर्माते जेव्हा त्याच्याशी मानधनाविषयी बोलत होते, तेव्हा त्याने ‘तुम्ही पैसे देऊन राम आणि चिरंजीवी यांच्याविषयी माझ्या मनात असलेले प्रेम विकत घेऊ शकत नाही’ असे म्हणत मानधन घेण्यास थेट नकार दिला”

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Salman khan has posted a special video congratulating chiranjeevi on the success of godfather yps