अभिनेता सलमान खान मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानच्या घरी जातानाचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. सलमानने मंगळवारी रात्री आमिरची भेट घेतल्याच्या चर्चा आहेत. सलमान व आमिरदरम्यान मागच्या काही वर्षांपासून कोल्ड वॉर सुरू असल्याचं मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटलं जातंय. अशातच आता भाईजानने आमिरच्या घरी जाऊन त्याची भेट घेतली आहे. त्यामुळे दोघांच्या कोल्ड वॉरवर पडदा पडणार, अशा चर्चांना उधाण आलंय.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आमिर खान आणि सलमान खान एकत्र चित्रपट बनवण्याच्या विचारात आहेत का? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. मुख्य म्हणजे जेव्हा सलमान आमिरच्या घरी गेला, तेव्हाच मुकेश भट्टही तिथे गेल्याचं म्हटलं जातंय. त्यामुळे हे तिघे मिळून नवीन प्रोजेक्टवर काम करत असावेत, अशा चर्चा सुरू झाल्या आहे. सलमानने अचानक आमिरची भेट का घेतली, याबद्दल कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही. पण इतक्या वर्षांनंतर सलमानला अचानक आमिरची आठवण कशी काय आली? असा प्रश्नही चाहत्यांना पडत आहे.

Pathaan Movie Review : जबरदस्त अ‍ॅक्शन, शाहरुख खानचा दमदार कमबॅक, पण कथेच्या बाबतीत कमकुवत ठरला ‘पठाण’

२०१६ मध्ये आमिर आणि सलमान यांच्यातील मतभेदाच्या बातम्या येऊ लागल्या होत्या. त्याचे कारण त्यांचे ‘सुल्तान’ आणि ‘दंगल’ हे चित्रपट होते. सलमान खानचा ‘सुल्तान’ जुलै २०१६ मध्ये रिलीज झाला होता. हा चित्रपट कुस्तीवर आधारित होता आणि आमिरचा ‘दंगल’ही कुस्तीवर आधारित होता. पण यामध्ये प्रसिद्ध पेहलान महावीर फोगट यांची कहाणी सांगण्यात आली होती. हा चित्रपट डिसेंबर २०१६ मध्ये प्रदर्शित झाला होता. आमिरने त्याच्या चित्रपटाच्या विषयाशी मिळतीजुळती कथेवर आधारित चित्रपट बनवून प्रदर्शित केल्याने सलमान नाराज झाला होता. मात्र, या मुद्द्यावरून सलमान किंवा आमिरमध्ये भांडण झाले नाही. पण त्यानंतर दोघांमध्ये कोल्ड वॉर सुरू झाला होता.

मीडिया रिपोर्ट्समध्ये असंही म्हटलं जातं की एका रात्री पार्टीमध्ये आमिरच्या बोलण्यावर सलमान चिडला होता. सलमानने त्याच्या चित्रपटांची काळजी करू नये, कारण त्याच्या चित्रपटांमध्ये कोणतेही तर्क नसतात आणि ते असेच चालतात, असं आमिर म्हणाला होता. या गोष्टीमुळे सलमान नाराज झाला आणि त्याचं आमिरबरोबर आलबेल नसल्याच्या बातम्या येऊ लागल्या. आमिरने त्याच्या या चित्रपटाचे नाव ‘दंगल’ ठेवल्यामुळे सलमानला अधिक राग आल्याचंही म्हटलं जातं.

भारताची अधिकृत एंट्री ‘छेल्लो शो’ ऑस्करच्या शर्यतीतून बाहेर; तर ‘कांतारा’, ‘काश्मीर’ फाइल्स’लाही नामांकन नाही

दरम्यान, या वादांच्या चर्चावर सलमान ‘पीटीआय’ला म्हणाला होता की, “माझ्या आणि आमिरमधील भांडणाच्या बातम्यांमध्ये तथ्य नाही. आमचं कोणतंही भांडण किंवा वाद झालेला नाही.”

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Salman khan meets aamir khan midnight rumors of cold war after sultan dangal release hrc