बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि कतरिना कैफचा ‘टायगर ३’ उद्या म्हणजे १२ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या चित्रपटाची चर्चा सुरु आहे. ‘टायगर’ आणि ‘टायगर जिंदा है’ चित्रपटाप्रमाणेच टायगर ३ मध्येही प्रेक्षकांना सलमान आणि कतरिनाचा अॅक्शन लूक बघायला मिळणार आहे. ‘टायगर ३’ च्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात झाली. या चित्रपटाने अ‍ॅडव्हान्स बुकिंगच्या माध्यमातून मोठी कमाई केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अ‍ॅडव्हान्स बुकिंगमधून चित्रपटाने १५ कोटी ५८ लाख रुपयांची कमाई केली आहे. ॲडव्हान्स बुकिंग पाहता पहिल्याच दिवशी हा चित्रपट मोठी कमाई करू शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. ‘टायगर ३’ पहिल्याच दिवशी भारतात जवळपास ३५ कोटींची कमाई करू शकतो, तर जगभरात १०० कोटींचा व्यवसाय करण्याची शक्यता आहे. याबरोबरच ‘यश राज फिल्म्स’च्या ‘स्पाय युनिव्हर्स’मधील आगामी ‘टायगर वि. पठाण’चीही जबरदस्त चर्चा आहे.

आणखी वाचा : बॉलिवूडचे ‘ही-मॅन’ धर्मेंद्र यांनी घेतली उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट; फोटो व व्हिडीओ व्हायरल

शाहरुख खानच्या ‘पठाण’नंतरच या दोघांना घेऊन हा चित्रपट येणार अशी चर्चा होती. त्यानंतर याबद्दल बऱ्याच गोष्टी समोर आल्या. आता नुकतंच खुद्द सलमान खानने यावर भाष्य केलं आहे. ‘व्हरायटी डॉट कॉम’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये सलमानला त्याच्या ‘टायगर वि. पठाण’बद्दल विचारणा झाली, तेव्हा त्यावर उत्तर देताना सलमान म्हणाला, “टायगर हा कायम तयारच आहे, त्यामुळे जेव्हा कथा लॉक होईल तेव्हा मी तातडीने पोहोचेन.”

अद्याप याबद्दल अधिकृत घोषणा झालेली नसली तरी सलमान व शाहरुखला पुन्हा मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक फार उत्सुक आहे. सलमान सध्या ‘टायगर ३’मुळे सध्या चांगलाच चर्चेत आहे. ‘एक था टायगर’, ‘टायगर जिंदा है’, ‘वार’ आणि ‘पठाण’ नंतर ‘टायगर 3’ हा यश राज फिल्मस स्पाय युनिव्हर्सचा पाचवा चित्रपट आहे. टायगर ३ मध्ये सलमान खान आणि कतरिना कैफशिवाय इमरान हाश्मीचीही मुख्य भूमिका आहे. टायगर ३ मध्ये सलमान आणि कतरिनाबरोबर इमरानचेही अॅक्शन सीन्स बघायला मिळाणार आहेत. मनीष शर्मा दिग्दर्शित ‘टायगर ३’ हिंदीबरोबरच तामिळ व तेलुगु भाषेतही प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Salman khan speaks about tiger vs pathaan film from spy universe avn