Sam Manekshaw Daughter message to Vicky Kaushal: विकी कौशलने फिल्ड मार्शल सॅम माणेकशा यांच्या जीवनावर आधारित ‘सॅम बहादुर’ (Sam Bahadur) चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती. यानंतर तो ‘बॅड न्यूज’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला. ‘सॅम बहादुर’ व ‘बॅड न्यूज’ या दोन्हीमधील विकीच्या भूमिका खूप वेगळ्या आहेत. ‘बॅड न्यूज’मधील ‘तौबा तौबा’ हे गाणं प्रदर्शित झाल्यानंतर विकीला सॅम माणेकशा यांच्या मुलीने मेसेज केला होता, असं त्याने सांगितलं.

सॅम माणेकशा यांची भूमिका आजपर्यंतची सर्वात आव्हानात्मक भूमिका होती असं विकी कौशल अनेकदा म्हणतो. दिवंगत फिल्ड मार्शल यांच्या कन्या माया माणेकशा यांच्याशी संबंधित एक प्रसंग विकीने सांगितला आहे. त्याच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘बॅड न्यूज’ या चित्रपटातील ‘तौबा तौबा’ हे गाणं पाहिल्यानंतर माया यांनी विकीला एक मेसेज पाठवला.

अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांनी केलं होतं अरेंज मॅरेज, कोण आहेत त्यांचे पती? जाणून घ्या

माया यांनी विकीला काय मेसेज केला?

विकी म्हणाला, “एक दिवस ‘तौबा तौबा’ गाणं पाहिल्यावर माया यांनी मला मेसेज केला. त्यांनी विचारलं ‘कोण आहे हा मुलगा?’ मी गोंधळलो. मग त्या म्हणाल्या, ‘पाच महिन्यांपूर्वी बाबा होतास तू, आता कोण झालास! तुझ्यात मी माझ्या वडिलांना बघत होते, त्यामुळे तू अशी गाणी, चित्रपट करू शकत नाहीस.’ त्यांना बॅड न्यूज पाहून कदाचित तसं वाटलं असेल. पण हे माझं काम आहे, पण मला ही आतापर्यंत मिळालेली सर्वात मोठी कॉम्प्लिमेंट वाटली.”

ऐश्वर्या रायपासून घटस्फोट घेण्याच्या चर्चांवर अखेर अभिषेक बच्चनने सोडलं मौन; म्हणाला…

सॅम माणेकशा यांच्या भूमिकेबद्दल विकी म्हणाला…

या मुलाखतीत विकीने सॅम माणेकशा यांच्या भूमिकेबद्दलही मत व्यक्त केलं. “एका लष्करी अधिकाऱ्याची भूमिका वठवणं व ज्याला लष्कर लीजेंड मानतं एका अशा लष्करी अधिकाऱ्याची भूमिका वठवणं या दोन्ही गोष्टीत खूप फरक आहे. ही एक खूप मोठी जबाबदारी आहे. मी लहानपणी माझ्या आई-वडिलांकडून सॅम माणेकशा यांच्याबद्दल खूप ऐकलंय. ज्यांच्या गोष्टी ऐकत मोठा झालो, त्यांचीच भूमिका साकारण्याची संधी मिळणं ही एक खूप मोठी जबाबदारी होती,” असं विकी कौशल म्हणाला.

प्रसिद्ध अभिनेत्री कामावर जाण्याआधी जुळ्या मुलांबरोबर घालवतेय वेळ, फोटो शेअर करत म्हणाली…

‘सॅम बहादुर’ चित्रपटात विकी कौशल मुख्य भूमिकेत होता. तर अभिनेत्री सान्या मल्होत्रा हिने सॅम माणेकशा यांच्या पत्नीची भूमिका केली होती. अभिनेत्री फातिमा सना शेख हिने या चित्रपटात भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारली होती. हा चित्रपट १ डिसेंबर २०१३ रोजी रणबीर कपूरचा ‘अॅनिमल’ चित्रपटाबरोबर प्रदर्शित झाला होता.