Premium

“पूढील चित्रपट ‘अ‍ॅनिमल’पेक्षाही…” संदीप रेड्डी यांचा जुना व्हिडीओ चर्चेत

‘अ‍ॅनिमल’च्या प्रमोशनदरम्यान संदीप यांनी बऱ्याच मुलाखती दिल्या. त्यापैकी एका तमिळ वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीमधील संदीप यांचं हे वक्तव्य चर्चेत आलं आहे

sandeep-reddy-vanga2
फोटो : सोशल मीडिया

फक्त तीनच चित्रपट देऊन दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा हे लोकप्रियतेच्या शिखरावर विराजमान झाले आहेत. ‘अर्जुन रेड्डी’, ‘कबीर सिंह’ पाठोपाठ सुपरहीट ‘अ‍ॅनिमल’ हा सुपरहीट चित्रपट संदीप रेड्डी वांगा यांनी दिला. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ६०० कोटींहून अधिक कमाई जगभरात केली आहे. चित्रपटाचा विषय, त्याची हाताळणी अन् एकूणच त्यातील वादग्रस्त सीन्स यामुळे चित्रपटावर प्रचंड टीका होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लोकांना हिंसक चित्रपट काय आहे हे दाखवेन असं एका मुलाखतीमध्ये वक्तव्य देण्याऱ्या संदीप रेड्डी वांगा यांचं आणखी एक वक्तव्य चर्चेत आलं आहे.

आणखी वाचा : “वडिलांनी ज्या चुका केल्या त्या…” पत्नीला काम करू देण्याच्या निर्णयाबद्दल बॉबी देओलचं विधान चर्चेत

एक मुलाखतीदरम्यान संदीप रेड्डी वांगा यांनी ‘अ‍ॅनिमल’पेक्षा अधिक डार्क चित्रपट काढायचं भाष्य केलं आहे. वांगा यांची ही मुलाखत ‘अ‍ॅनिमल’ प्रदर्शित होण्याआधीची आहे. जी आता ‘अ‍ॅनिमल’ला मिळणाऱ्या घवघवीत यशानंतर चर्चेत आली आहे. या मुलाखतीमध्ये संदीप रेड्डी वांगा हे ‘अ‍ॅनिमल’च्या यशाबद्दल तर बोललेच आहे पण त्यांच्या डोक्यात अजूनही वेगळं, मोठं आणि गडद काहीतरी शिजतंय हेदेखील त्यांनी या मुलाखतीत स्पष्ट केलं.

‘अ‍ॅनिमल’च्या प्रमोशनदरम्यान संदीप यांनी बऱ्याच मुलाखती दिल्या. त्यापैकी एका तमिळ वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीमधील संदीप यांचं हे वक्तव्य चर्चेत आलं आहे. या मुलाखतीदरम्यान संदीप म्हणाले, “परमेश्वराच्या कृपेने जर ‘अ‍ॅनिमल’ सुपरहीट झाला, आणि तो होईलच. तर मी हे पात्र आणि या कथेच्या आणखी खोलात जायचा प्रयत्न करेन. मी आणि रणबीर आणखी एका अशाच गडद अन् गंभीर विषयावर काम करत आहोत. त्यामुळे मला वाटतं की जर हा चित्रपट सुपरहीट झाला तर आम्ही पूढील चित्रपटात असंच काहीसं काम करायला हवं.”

अर्थात या जुन्या मुलाखतीमध्ये संदीप रेड्डी वांगा हे ‘अ‍ॅनिमल’च्या सीक्वलबद्दल भाष्य करत होते ज्याची एक छोटीशी पण अत्यंत अस्वस्थ करणारी अशी एक झलक आपल्याला या चित्रपटाच्या शेवटी पोस्ट क्रेडिटमध्ये पाहायला मिळाली. या चित्रपटाचा सीक्वल ‘अ‍ॅनिमल पार्क’ची झलक सोशल मीडियावरही चांगलीच व्हायरल झाली आहे. यावरुन पूढील भागात आणखी किती रक्तपात आणि हिंसा पाहायला मिळणार आहे याचा अंदाज प्रेक्षकांना आला असेल. याबरोबरच संदीप रेड्डी वांगा प्रभासबरोबर ‘स्पिरीट’ या चित्रपटावर लवकरच काम सुरू करणार आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sandeep reddy vanga spoke about animal sequel in old interview says it will be more dark avn

First published on: 10-12-2023 at 15:55 IST
Next Story
“वडिलांनी ज्या चुका केल्या त्या…” पत्नीला काम करू देण्याच्या निर्णयाबद्दल बॉबी देओलचं विधान चर्चेत