scorecardresearch

Premium

“वडिलांनी ज्या चुका केल्या त्या…” पत्नीला काम करू देण्याच्या निर्णयाबद्दल बॉबी देओलचं विधान चर्चेत

बॉबीच्या कमबॅक मधला हा सर्वात धमाकेदार आणि हटके चित्रपट ठरला आहे. या चित्रपटातून बॉबीला एक वेगळीच ओळख मिळाली आहे

bobby-deol2
फोटो : इंडियन एक्सप्रेस

संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित ‘अ‍ॅनिमल’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. चित्रपटाने ६०० कोटींची कमाई जगभरात केली आहे. चित्रपटावर वेगवेगळ्या पद्धतीने टीका होत असली तरी प्रेक्षक याचं कौतुकही करताना दिसत आहेत. चित्रपटातील रणबीर कपूर, अनिल कपूर, रश्मिका मंदाना, तृप्ती डिमरी यांच्या कामाची प्रशंसा होत आहे. यांच्याबरोबरच या चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारणाऱ्या बॉबी देओललाही लोकांनी डोक्यावर घेतलं आहे.

आणखी वाचा : Panchayat 3: अखेर प्रतीक्षा संपली! ‘पंचायत ३’चा फर्स्ट लूक समोर, सचिवजी व बनराकस यांचा अतरंगी अवतार समोर

case registered, extortion, businessman, offensive videos, mumbai
आक्षेपार्ह चित्रफीतीच्या माध्यमातून व्यावसायिकाकडे २५ कोटींच्या खंडणीची मागणी, ३५ वर्षीय महिलेविरोधात गुन्हा दाखल
bhumi pednekar
भूमीला आईकडून मिळतं सोन्याचं नाणं…
razakar-trailer
“ओम शब्द आणि भगवा रंग…”, हैदराबाद नरसंहारावर बेतलेल्या ‘रजाकार’ चित्रपटाचा अस्वस्थ करणारा ट्रेलर प्रदर्शित
Hrithik Roshan Deepika Padukone Kissing Scene In Uniform
हृतिक रोशन-दीपिका पदुकोणच्या किसिंग सीनमुळे ‘फायटर’ अडचणीत, वायुसेनेच्या अधिकाऱ्याकडून निर्मात्यांना नोटीस

बॉबीच्या कमबॅक मधला हा सर्वात धमाकेदार आणि हटके चित्रपट ठरला आहे. या चित्रपटातून बॉबीला एक वेगळीच ओळख मिळाली आहे. याआधी बरीच वर्षं बॉबी घरात बसून होता, तो कोणत्याही चित्रपटाची ऑफर स्वीकारत नव्हता. उलट तो घरात बसायचा अन् त्याची पत्नी बाहेर जाऊन काम करायची याचा खुलासा त्यांने याआधीही कित्येक मुलाखतीदरम्यान केला आहे. आता या चित्रपटाच्या निमित्ताने ‘झुम’शी संवाद साधताना बॉबीने त्याच्या पत्नीच्या काम करण्याबद्दल भाष्य केलं आहे.

बॉबी म्हणाला, “मी ज्या वातावरणात लहानाचा मोठा झालो ती परिस्थिति वेगळी होती. त्याकाळात तुम्हाला तुमच्या पालकांशी अदबीनेच वागावे लागत असे, त्यांच्यापासून योग्य अंतर ठेवूनच तुम्हाला राहावे लागत होते. एका मर्यादेपलीकडे तुम्ही जाऊ शकत नव्हता, तुम्ही तुमच्या आईशी भले वाद घातले किंवा भांडण केलं तरी वडिलांशी मात्र सावध राहूनच वागवं लागत असे. परंतु माझ्या मुलांच्या बाबतीत असा काही प्रकार घडताना मी पाहिलेला नाही.”

पुढे बॉबी म्हणाला, “मी अत्यंत खुल्या आणि व्यापक विचारांचा माणूस आहे. मी कधीच माझ्या पत्नीला नोकरी किंवा कामधंदा करण्यापासून रोखले नाही, मी कधीच तिला ती माझ्यापेक्षा कमी आहे हे भासू दिले नाही. आज मी ज्या ठिकाणी पोहोचलो आहे ते केवळ माझ्या पत्नीमुळेच.” याबरोबरच या मुलाखतीमध्ये बॉबीने त्याच्या आणि मुलांच्या नात्याबद्दलही खुलासा केला. “मुलांच्या जडणघडणीच्या बाबतीत कदाचित जी चूक आमच्या वडिलांकडून नकळतपणे झाले असेल, तर त्याच चुका मी करणार नाही.” असंही बॉबी या मुलाखतीमध्ये म्हणाला. आता ‘अ‍ॅनिमल पार्क’मध्ये बॉबी दिसणार की नाही यावरुन बरेच लोक प्रश्न विचारत असल्याचं स्पष्ट झालं आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bobby deol says he is broad minded person told that dont want repeat the mistakes of father avn

First published on: 10-12-2023 at 14:28 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×