बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खान सध्या त्याच्या ‘जवान’ चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. ७ सप्टेंबरला प्रदर्शित झालेल्या ‘जवान’चित्रपटाने सर्व रेकॉर्ड्स मोडत बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी केली आहे. चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर शाहरुख खानने अलीकडेच एक्सवर (पूर्वीचे ट्विटर) ‘आस्क एसआरके’सेशन घेतलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी ‘जवान’ फेम नयनतारा करायची ‘हे’ काम, जुना व्हिडीओ व्हायरल, अभिनेत्रीला ओळखणंही कठीण

एकीकडे ‘जवान’ चित्रपटाने हजार कोटी कमावले असले, तरीही दुसरीकडे काहीजण चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवर शंका उपस्थित करत आहेत. ‘जवान’च्या टीमने कॉर्पोरेट बुकिंग केल्यामुळे संपूर्ण कमाईचे आकडे फसवे आणि खोटे असल्याचा दावा अनेकांकडून करण्यात आला आहे. यावर चित्रपटाच्या टीमने किंवा शाहरुखने अद्याप काहीच स्पष्टीकरण दिलं नव्हतं. म्हणूनच एका नेटकऱ्याने बुधवारी घेतलेल्या ‘आस्क एसआरके’सेशनमध्ये शाहरुख खानला प्रश्न विचारला.

हेही वाचा : नाना पाटेकरांचा सूर बदलला? पहिले नाव न घेता केली ‘जवान’वर टीका, तर आता केलं शाहरुखचं कौतुक

“‘जवान’च्या कमाईचे आकडे खरंच खोटे आहेत का? असंख्य बातम्यांमधून कलेक्शनची खोटी आकडेवारी सांगण्यात येते. यावर तुझं म्हणणं काय आहे? ” नेटकऱ्याच्या या प्रश्नाला उत्तर देत शाहरुख म्हणाला, “गप्प बस…आणि फक्त मोजत राहा! आमची कमाई मोजताना अजिबात लक्ष विचलित करू नकोस.”

हेही वाचा : “मराठी बोलायला लाज वाटते का?”, अमृता खानविलकरच्या ‘त्या’ व्हिडीओवर नेटकऱ्याची कमेंट, अभिनेत्री उत्तर देत म्हणाली…

शाहरुख खान

शाहरुख खाने दिलेल्या उत्तराचं सध्या नेटकऱ्यांकडून कौतुक करण्यात येत आहे. “‘जवान’च्या कलेक्शनवर जळणारी लोकं असे प्रश्न विचारतात”, “शाहरुख खानच्या हजरजबाबीपणाची दाद द्यायला हवी”, “याचा अर्थ संपूर्ण आकडेवारी खरी आहे” अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी या एक्सवर (ट्विटर) दिल्या आहेत. दरम्यान, ‘जवान’ने जगभरात १ हजार कोटींहून अधिक कमाई केली आहे. हजार कोटींचा टप्पा गाठणारा हा यंदाच्या वर्षातील शाहरुखचा दुसरा चित्रपट आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shah rukh khan replies to netizen question who asked about jawan fake collection sva 00