अभिनेता शाहरुख खानला बॉलिवूडमध्ये ३१ वर्ष पूर्ण झाली आहे. दिवाना चित्रपटातून शाहरुख खानने बॉलिवूडमध्ये पदापर्ण केले होते. शाहरुख खानने गौरी खानशी लग्न केले. शाहरुख आणि गौरीला तीन मुल आहेत. आर्यन, सुहाना आणि अबराम. पण आर्यनच्या जन्माच्या वेळी गौरीची अवस्था खूप भयानक झाली होती. एका मुलाखतीत खुद्द शाहरुख खानने याबाबतचा खुलासा केला आहे.
याचा खुलासा शाहरुख खानने ३० सप्टेंबर १९९८ रोजी ‘रेडिफ’ला दिलेल्या मुलाखतीत केला होता. शाहरुखने सांगितले होते की, त्याने रुग्णालयातच आई-वडील गमावले असल्याने त्याला रुग्णालयात जाणे आवडत नव्हते. गौरी खानची ढासळलेली तब्येत आणि आर्यनच्या प्रसूतीच्या क्षणांची आठवण करून देताना शाहरुख म्हणाला होता, “मी रुग्णालयात माझे आई-वडील गमावले, त्यामुळे मला रुग्णालयात जाणे आवडत नाही. गौरी जरा अशक्त होती. पण मी तिला कधीच आजारी पडलेले पाहिले नव्हते.”
शाहरुख पुढे म्हणाला होता की, “जेव्हा मी गौरीला हॉस्पिटलमध्ये पाहिले तेव्हा डॉक्टरांनी तिच्या आत ट्यूब टाकल्या होत्या आणि इतर गोष्टी ठीक केल्या होत्या. ती मूर्च्छित झाली होती आणि ती खूप थंड झाली होती. मीही गौरीच्या सिझेरियनसाठी ऑपरेशन थिएटरमध्ये गेलो होतो. मला वाटलं ती मरेल. त्यावेळी मी मूल (आर्यन खान) जन्माला येईल याचा विचारही केला नव्हता. त्यावेळी माझ्यासाठी ते आवश्यक नव्हते. ती खूप थरथरत होती. मला एवढंच माहीत आहे की मुलांना जन्म देताना ती मरणार नाही, पण तरीही त्या वेळी मला भीती वाटत होती.”
शाहरुखच्या वर्कफ्रंटबाबत बोलायच झालं तर पठाणच्या यशानंतर शाहरुख ‘जवान’च्या शुटींगमध्ये व्यस्त आहे. ‘जवान’ या चित्रपटात शाहरुख खान दुहेरी भूमिकेत दिसेल असं बोललं जात आहे. या चित्रपटात त्याच्याबरोबर दक्षिणात्य अभिनेत्री समांथा रूथ प्रभूही महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे.