बॉलिवूड किंग शाहरुख खान त्याचा आगामी ‘पठाण’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटातील बेशरम गाण्यावरुन सध्या वादंग सुरू आहे. भगवी बिकिनी परिधान केलेल्या दीपिका पदुकोणबरोबर रोमान्स केल्यामुळे शाहरुखलाही ट्रोल केलं जात आहे. अशातच त्याचा एक जुना व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शाहरुखच्या या व्हिडीओमध्ये पाकिस्तानी कलाकारांना पाठिंबा देताना दिसत आहे. बॉलिवूड अभिनेत्री शर्लिन चोप्राने शाहरुख खानचा हा व्हिडीओ तिच्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे. “कोणताही धर्म किंवा काम देशाची एकता, अखंडता यापेक्षा मोठं नसतं, हे आईने सांगितलं नाही का?”, असं म्हणत शर्लिनने शाहरुखवर टीका केली आहे. शर्लिनने शेअर केलेल्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंटही केल्या आहेत.

हेही वाचा>>‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडताच विकास सावंतला लागली लॉटरी; प्रसिद्ध दिग्दर्शकाने दिली चित्रपटाची ऑफर

हेही वाचा>> “माझ्या तोंडातून बासुंदीचा सुगंध येतो”, राखी सावंतने सांगितला अभिजीत बिचुकलेचा ‘तो’ किस्सा

शाहरुख खानचा हा व्हिडीओ खूप वर्षांपूर्वीचा आहे. २६/११च्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकार, गायक व खेळाडूंच्या भारतात येण्यावर बंदी घालण्यात आली होती. तेव्हा शाहरुखने याचा विरोध केला होता. पाकिस्तानी खेळाडूंचं त्याने कौतुकही केलं होतं. आता त्याचा हा व्हिडीओ पुन्हा व्हायरल होत आहे. यामुळे नेटकरी त्याला ट्रोल करत आहेत.

हेही वाचा>>“ज्याला लावणी माहीत नाही त्याला…” मेघा घाडगेची संतप्त पोस्ट

‘पठाण’ हा चित्रपट २३ जानेवारी २०२३ला प्रदर्शित होणार आहे. तब्बल चार वर्षांच्या ब्रेकनंतर शाहरुख या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटात शाहरुख खान, दीपिका पदुकोण, जॉन अब्राहम या कलाकारांच्या मुख्य भूमिकेत आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shah rukh old video of supporting pakistani actors goes viral on pathaan controversy sherlyn chopra shared kak