झोया अख्तर दिग्दर्शित ‘द आर्चीज’ चित्रपटातून अनेक नवोदित कलाकार मंडळी बॉलीवूडमध्ये पदार्पण करत आहेत. महानायक, अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा, शाहरुख खानची लेक सुहाना खान आणि श्रीदेवी यांची दुसरी मुलगी खुशी कपूर ‘द आर्चीज’ चित्रपटाच्या माध्यमातून बॉलीवूडमध्ये पाऊल ठेवत आहेत. या चित्रपटाच्या प्रमोशनला जोरदार सुरुवात झाली आहे. काल (२५ नोव्हेंबर) मुंबईत ‘द आर्चीज’ चित्रपटाचा एक इव्हेंट पार पडला. यादरम्यानचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. शाहरुखच्या लेकीच्या डान्सने तर सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘द आर्चीज’ चित्रपटाच्या मुंबईत झालेल्या इव्हेंटमध्ये सुहाना खानने शॉर्ट फ्रॉक घातला होता, ज्यामध्ये ती खूप क्यूट दिसत होती. तिने यावेळी ग्रुप डान्स केला आणि अगस्त्य नंदाबरोबर एक रोमँटिक डान्स करतानाचा पाहायला मिळाली. ‘फिल्मी ग्यान’ आणि ‘विरल भयानी’ या इन्स्टाग्राम पेजवर सुहानाचे डान्स व्हिडीओ शेअर करण्यात आहेत.

हेही वाचा – ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’ २०२३च्या ट्रॉफिवर कोपरगावच्या गौरी अलका पगारेने कोरलं नाव

हेही वाचा – निकिता गांधीच्या कॉन्सर्टमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत ४ विद्यार्थ्यांचा मृत्यू, ६४ जखमी; गायिका शोक व्यक्त करत म्हणाली, “ही दुर्दैवी…”

सुहाना आणि अगस्त्यच्या रोमँटिक डान्समध्ये दोघांची केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. सध्या हे दोघं एकमेकांना डेट करत असल्याच्या वावड्या उठल्या आहेत.

दरम्यान, ‘द आर्चीज’ चित्रपटात सुहाना, अगस्त्य, खुशी व्यतिरिक्त डॉट, वेदांग रैना, मिहिर आहुजा आणि युवराज मेंडा असे नवोदित कलाकार दिसणार आहेत. ७ नोव्हेंबरला हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाची कथा ६०च्या दशकातील प्रेम,मैत्री आणि दु:ख यावर आधारलेली आहे. चित्रपटाचे संपूर्ण कथानक प्रसिद्ध अमेरिकन कॉमिक ‘द आर्चीज’वर आधारित आहे. दिग्दर्शक झोया अख्तरने कॉमिक बुकमधील पात्रांना भारतीय लुक देण्याचा प्रयत्न केला आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shahrukh khan daughter suhana khan danced with agastya nanda on stage video viral pps