शाहरुख खानचा पठाण हा चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटाला सर्वत्र तुफान प्रतिसाद मिळताना दिसत आहे. प्रदर्शनाच्या आधीपासूनच या चित्रपटाने नवे विक्रम नोंदवायला सुरुवात केली होती. तर आतापर्यंत या चित्रपटाने अनेक रेकॉर्ड्स मोडले आहेत. एकीकडे हा चित्रपट रेकॉर्डब्रेक कामगिरी करत असतानाच दुसरीकडे मात्र काहींना हा चित्रपट फारसा आवडला नाहीये. आता शाहरुखला एका प्रेक्षकाने थेट त्याची नापासंती कळवली. त्यावर शाहरुख खानने दिलेल्या उत्तराने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. ‘पठाण’ प्रदर्शित झाल्यानंतर आता पहिल्यांदाच शाहरुख खानने चाहत्यांशी संवाद साधला. त्यासाठी त्याने ‘आस्क एसआरके’ (AskSRK) हे प्रश्न-उत्तरांचं एक सेशन ठेवलं होतं. या सेशनच्या माध्यमातून शाहरुखला त्याच्या चाहत्यांनी अनेक प्रश्न विचारले. शाहरुखनेही अनेक प्रशांना उत्तरं दिली. याच सेशनदरम्यान 'पठाण' चित्रपटाचा उत्तरार्ध आवडला नाही, असं एका नेटकऱ्याने शाहरुखला सांगितलं. आणखी वाचा : याला म्हणतात जबरा फॅन! ‘पठाण’ पाहण्यासाठी शाहरुखचे चाहते बांगलादेशहून थेट भारतात एका नेटकऱ्याने ट्वीट करत लिहिलं, "'पठाण'चा पूर्वार्ध चांगला आहे. पण या चित्रपटाचा उत्तरार्ध निराशाजनक आहे. याबाबत तुझं मत काय?" या ट्वीटला उत्तर देताना शाहरुखने लिहिलं, "काही हरकत नाही. प्रत्येकाची आपली अशी वेगळी आवड असते. या वीकएण्डला तू 'पठाण' चित्रपटाचा पूर्वार्ध बघ आणि ओटीटीवर दुसऱ्या एखाद्या चित्रपटाचा उत्तर अर्थ बघ." आता त्याच्या या उत्तराने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं आहे. त्याच्या या उत्तरावर अनेकांनी त्याला विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्याचप्रमाणे अनेकांनी त्याच्या हजारजबाबीपणाचं कौतुक केलं आहे. https://twitter.com/iamsrk/status/1621764707261767681?t=8S8_BjhHOmwZJIjj9OOzMw&s=08 हेही वाचा : “तू आता रिटायरमेंट घे,” नेटकऱ्याच्या सल्ल्यावर शाहरुख खानचं चोख उत्तर, म्हणाला… दरम्यान ‘पठाण’ हा चित्रपट २५ जानेवारी रोजी प्रदर्शित झाला. हा चित्रपट चित्रपटगृहात उत्कृष्ट कामगिरी करताना दिसत आहे. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने भारतातून ५० कोटी तर जगभरातून १०० कोटींची कमाई केली. तर आतापर्यंत या चित्रपटाने भारतात ५०० हून अधिक कोटी आणि जगभरातून ८०० हून अधिक कोटींची कमाई केली आहे.