बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. अभिनय नाही तर दिग्दर्शक म्हणून तो बॉलिवूडमध्ये काम करणार आहे. याची माहिती आर्यनने त्याच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत दिली आहे. आर्यनच्या या पोस्टवर अनेक बॉलिवूड कलाकारांनी कमेंट करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. याशिवाय आर्यनची आई गौरी खान आणि बाबा शाहरुख खानने त्याच्या पोस्टवर कमेंट करत प्रतिक्रिया दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बॉलिवूडच्या स्टार किड्समध्ये सर्वाधिक चर्चेत राहिलेला आर्यन खान आगामी काळात दिग्दर्शक म्हणून बॉलिवूडमध्ये काम करताना दिसणार आहे. आर्यन खानने त्याच्या चित्रपटाची स्क्रिप्टही पूर्ण केली आहे असं बोललं जातंय. आपल्या वडिलांचं प्रॉडक्शन हाऊस ‘रेड चिलीज’मध्येच काम करणार आहे. आर्यनने इन्स्टाग्रामवर त्याच्या स्क्रिप्ट नोटबुकचा फोटो शेअर केला आहे. या फोटोच्या कॅप्शनध्ये त्याने लिहिलंय, “लिखाणाचे काम पूर्ण झाले आहे आता शूटिंगसाठी उत्सुक आहे.”

आणखी वाचा- मुलगी अभिनेत्री अन् मुलगा बनणार लेखक; शाहरुख खानचा लेक आर्यन खान पदार्पणासाठी सज्ज

आर्यन खानच्या या पोस्टवर शाहरुख खान आणि गौरी खान यांनी कमेंट्स केल्या आहेत. आर्यनच्या फोटोवर कमेंट करताना गौरी खानने लिहिलं, “तुझं काम पाहण्यासाठी खूपच उत्सुक आहे.” तर शाहरुखनेही आनंद व्यक्त करत आर्यनच्या फोटोवर कमेंट केली आहे. त्याने लिहिलं, “व्वा, खूप छान. विचार कर आणि विश्वास ठेव एक ना एक दिवस स्वप्न नक्कीच पूर्ण होतं. आता काहीतरी करुन दाखवण्याची वेळ आली आहे. पहिल्या प्रोजेक्टसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. पहिलं काम नेहमीच खास असतं.”

आणखी वाचा- Vidoe: घटस्फोटानंतर हनी सिंग पुन्हा प्रेमात, गर्लफ्रेंडचा हात पकडून कार्यक्रमात आला अन्…

दरम्यान आर्यन खानने परदेशातून फिल्ममेकिंगचं शिक्षण घेतलं आहे. लवकरच तो एका लेखका आणि दिग्दर्शकाच्या भूमिकेत बघायला मिळणार आहे. शाहरुखची मुलगी सुहाना खान ही झोया अख्तरच्या चित्रपटातून बॉलिवूड पदार्पण करणार आहे. सुहानाने अभिनय क्षेत्रात करियर करायचं निश्चित केलं आहे. लवकरच तिचा ‘द आर्चीज’ हा चित्रपच नेटफ्लिक्सवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shahrukh khan reaction on aryan khan bollywood debut as director mrj