गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असणार कपल रकुल प्रीत सिंग व जॅकी भगनानी अखेर लग्नबंधनात अडकलं आहे. माहितीनुसार, शीख पद्धतीत दोघांचं लग्न झालं आहे. गोव्यात थाटामाटात हा लग्नसोहळा पार पडला आहे. अशातच रकुल व जॅकीच्या संगीत सोहळ्यातील शिल्पा शेट्टीच्या जबरदस्त डान्सने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

रकुल प्रीत सिंग-जॅकी भगनानीच्या संगीत सोहळ्यातला व्हिडीओ एक्सवर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये शिल्पा शेट्टी पती राज कुंद्रासह जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. ‘मुंडियन बच के रही’ या गाण्यावर दोघं डान्स करताना पाहायला मिळत आहे. रकुल-जॅकीच्या संगीत सोहळ्यातील सूत्रसंचालनाची धुरा रितेश देशमुखने सांभाळली होती.

हेही वाचा – Video: शिवानी सुर्वे-अजिंक्य ननावरेच्या लग्नातला Unseen व्हिडीओ पाहिलात का? ‘अशी’ झाली होती दोघांची मंडपात एन्ट्री

संगीत सोहळ्यासाठी ड्रेस कोड ठरवला होता. सर्व पाहुण्यांना शिमरी ड्रेस घालायचा होता. विशेष म्हणजे जॅकीने रकुलसाठी एक विशेष गाणं तयार केलं होतं, ज्यामधून त्यांची संपूर्ण प्रेमकहाणी सांगण्यात आली होती.

हेही वाचा – विद्या बालनने घेतली मुंबई पोलिसात धाव, सोशल मीडिया ठरलंय निमित्त; नेमकं काय घडलं? जाणून घ्या…

दरम्यान, रकुल व जॅकी प्रेमकहाणीबद्दल बोलायचं झालं तर, दोघं एकाच बिल्डिंगमध्ये राहत होते आणि दोघं एकमेकांचे शेजारी होते. पण तरीही दोघांमध्ये कधीच जास्त बोलणं होतं नव्हतं. दोघांची पहिली भेट लॉकडाऊनच्या वेळी झाली होती. ३ ते ४ महिने दोघांची चांगली मैत्री होती. त्यानंतर दोघं रिलेशनशिपमध्ये आले. आता ४ वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर लग्नबंधनात अडकत आहेत.