बॉलिवूड कपल सिद्धार्थ मल्होत्रा व कियारा अडवाणी विवाहबंधनात अडकणार आहेत. जैसलमेरमधील सूर्यगढ पॅलेसमध्ये त्यांचा शाही विवाहसोहळा पार पडणार आहे. सिद्धार्थ-कियाराच्या लग्नाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी सिद्धार्थ-कियाराच्या लग्नासाठी हजेरी लावणार आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सिद्धार्थ-कियाराच्या लग्नापूर्वीच्या विधींनी कालपासून सुरुवात झाली आहे. संगीत आणि मेहेंदी सोहळ्यासाठी सूर्यगढ पॅलेसवर रोषणाई करण्यात आली होती. त्याचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. याबरोबरच कियाराचा वेडिंग लूकमधील फोटोही व्हायरल होत आहे.

हेही वाचा>> ७५ महिलांना अंगद बेदीने केलंय डेट; नोरा फतेहीबरोबर होतं अफेअर, पण नेहा धुपिया गरोदर राहिली अन्…

लग्नाआधीच कियाराचा लेहेंग्यातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये कियाराने बदामी रंगाचा लेहेंगा परिधान केल्याचं दिसत आहे. खड्यांच्या ज्वेलरीने कियाराने साज केला आहे. या फोटोत कियाराचा राजस्थानी लूक पाहायला मिळत आहे. परंतु, कियाराचा हा व्हायरल होणारा फोटो जुना आहे.

हेही वाचा>> Sidharth-Kiara Wedding: दाल-बाटी, २० प्रकारचे गोड पदार्थ अन्…; सिद्धार्थ-कियाराच्या लग्नात पंजाबी-राजस्थानी पदार्थांची मेजवानी

हेही पाहा>> “माझे सर्व पैसे आदिल खानने घेतले”, राखी सावंतचे पतीवर धक्कादायक आरोप; म्हणाली “माझा शारीरिक अन्…”

सिद्धार्थ व कियाराच्या लग्नासाठी अंबानी कुटुंबीय, जुही चावला, मनिष मल्होत्रासह अनेक सेलिब्रिटी हजेरी लावणार आहेत. लग्नातील पाहुण्यांसाठी सिद्धार्थ-कियाराने पॅलेसवरील ८४ खोल्यांचं बुकिंग केलं आहे. शिवाय पाहुण्यांसाठी चोख बंदोबस्तही करण्यात आला आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sidharth malhotra kiara advani wedding actress photo in lehenga look goes viral kak